Ration Card News : रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. खरंतर अनेकांच्या माध्यमातून रेशन कार्ड मध्ये नवीन नाव ऍड करण्यासाठी जुन्या रेशन कार्ड मधील नाव कमी करण्यासाठीची ऑनलाइन प्रोसेस कशी आहे असा सवाल उपस्थित केला जात होता.
यामुळे आज आपण अशा लोकांसाठी नवीन रेशन कार्ड मध्ये नाव ॲड करण्यासाठी जुने रेशन कार्ड मधील नाव घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कसे कमी करता येऊ शकते याविषयी महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
Ration Card मधील नाव कमी करण्याची ऑनलाईन प्रोसेस
यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. https://rcms.mahafood.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे.
या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी Sign In/ Register या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर ऑफिस लॉगिन आणि पब्लिक लॉगिन हे दोन पर्याय दिसतील. या पर्यायांपैकी पब्लिक लॉगिन या पर्यावर क्लिक करायचे आहे.
पब्लिक लॉगिन पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. या नवीन पेजवर तुम्हाला न्यू युजर साइन अप हिअर या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. यानंतर I have a valid ration card या पर्यावरण टिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला दिलेल्या रकान्यात बारा अंकी रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. मग तुम्हाला चेक रेशन कार्ड वर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्या कुटुंबप्रमुखाचा आधार क्रमांक स्क्रीनवर दिसेल. याच्या खाली मग तुम्हाला कॅपच्या कोड टाकून गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
मग दिलेल्या रकान्यात ओटीपी टाकायचा आहे. नंतर ओटीपी व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. मग तुम्हाला लॉगिन आयडी तयार करावा लागणार आहे. हा आयडी तयार केल्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. मग तुम्हाला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल.
यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. अशा तऱ्हेने तुमचे अकाउंट तयार होणार आहे. यानंतर तुम्हाला click here to login या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला या वेबसाईटवर पुन्हा एकदा लॉगिन करावे लागणार आहे.
त्यासाठी तुम्ही लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरू शकता. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला होम पेजवर ration card modification या ऑप्शनवर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड मध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांची नावे तिथे दिसतील.
या नावांमधून तुम्हाला ज्या सदस्याचे नाव कमी करायचे आहे त्याच्या नावापुढे असलेल्या चुकीच्या चिन्हावर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर मग तुम्हाला खाली दिलेल्या confirm and proceed to submit या पर्यायावर क्लिक करायचे आहे. एवढे केल्यानंतर सदर व्यक्तीचे नाव व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर कमी होणार आहे.