RBI Bank Rule : रिझर्व बँक ऑफ इंडिया ही देशातील एक मध्यवर्ती बँक असून या संस्थेचे देशभरातील बँकांवर नियंत्रण असते. आरबीआयने बँकांसाठी तसेच बँक खातेधारकांसाठी काही नियम तयार केले आहेत. या नियमांचे सर्वांनाच पालन करावे लागते. नियमांचे उल्लंघन झाल्यास आरबीआयकडून दंडात्मक कारवाई केली जाते.
बँकेकडून जर नियमांचे उल्लंघन झाले असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते किंवा मग बँकेचा परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे.
यामध्ये जर सेविंग अकाउंटमध्ये 30 हजार रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम असेल तर असे बँक अकाउंट बंद करण्याचा निर्णय आरबीआयच्या गव्हर्नर यांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आरबीआयने असा कोणताच निर्णय घेतलेला नाही.
दरम्यान, आता आपण आरबीआयने सेविंग बँक अकाउंट मध्ये पैसे ठेवण्याची काही मर्यादा ठरवून दिली आहे का, खातेधारक त्याच्या सेविंग अकाउंट मध्ये किती पैसे जमा करू शकतो ? याबाबत आरबीआयचे नियम काय आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
बँकेत किती पैसे ठेवले जाऊ शकतात ?
रिझर्व बँक ऑफ इंडियाने तयार केलेल्या नियमांनुसार, तुम्ही तुमच्या बँक खात्यात तुम्हाला हवे तेवढे पैसे ठेवू शकतात. बँक खात्यात हजारो, लाखो किंवा कोटी रुपये ठेवले जाऊ शकतात.
तसेच बँक खात्यात जमा करण्यात आलेल्या पैशांमधून तुम्ही तुम्हाला हवी तेवढी रक्कम काढू शकतात. म्हणजे बँक खात्यात पैसे जमा करण्यासंदर्भात आणि पैसे काढण्यासंदर्भात कोणतेच नियम तयार करण्यात आलेले नाहीत.
पण, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की तुम्हाला तुमच्या पैशाचा हिशोब करून ठेवावा लागणार आहे. तुमच्या बँक खात्यात असणारा पैसा हा कोठून आणि कसा आला ? याबाबतचे सर्व प्रूफ तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
किमान शिल्लक ठेवण्याचा नियम आहे
बँकांमध्ये कमाल रक्कम ठेवण्याचे कोणतेही नियम नाहीत. पण किमान शिल्लक ठेवण्याचा नियम नक्कीच आहे.
म्हणजे तुमच्या बँक खात्यात एक ठराविक रक्कम असली पाहिजे, जर ती त्यापेक्षा कमी झाली तर अशावेळी बँकेकडून चार्जेस वसूल केले जाऊ शकतात.
अर्थातच बँक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. याचा नियम मात्र आरबीआय ठरवत नाही. हा नियम तुमचे ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेकडून ठरवला जात असतो.