SBI नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांना देणार 15 लाखाचे कार लोन ! व्याजदर, लोन टेन्यूर याविषयी सविस्तर माहिती वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI कार Loan : तुमचेही कार खरेदी करण्याचे स्वप्न आहे का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरंतर, अनेकांना नवीन कार खरेदी करायची आहे, मात्र तेवढे बजेट नाहीये.

यामुळे अनेकजण थोडेफार पैसे डाऊनपेमेंट करून नवीन कार खरेदी करतात. नवीन कार खरेदी करण्यासाठी अनेक बँका परवडणाऱ्या व्याजदरात ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देत आहेत.

एसबीआय ही पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक देखील ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात कार लोन देत आहे. दरम्यान आज आपण एसबीआयच्या कार लोनची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कार लोनसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया किती व्याजदर आकारते ? याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.

एसबीआय कार लोनसाठी किती व्याज आकारते ?

मिळालेल्या माहितीनुसार, SBI सध्या 8.85 टक्के प्रारंभिक व्याज दराने कार कर्ज देत आहे. मात्र हे व्याजदर अशा ग्राहकांना मिळणार आहे ज्यांचा सिबिल स्कोर चांगला आहे.

CIBIL स्कोअर 750 पेक्षा जास्त असलेल्यांना हा व्याजदर दिला जात आहे. दरम्यान आता आपण एसबीआय कडून जर या किमान व्याजदरात एखाद्या ग्राहकाला 15 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल हे पाहणार आहोत.

15 लाखाच्या कर्जासाठी किती व्याज भरावे लागेल?

एसबीआयकडून जर 8.85% या व्याज दरात एखाद्याला 5 वर्षांसाठी ₹ 15,00,000 चे कार लोन मिळाले, तर त्यांना 31,028 रुपयांचा मासिक हप्ता किंवा ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच तीन लाख 61 हजार 707 रुपये व्याज म्हणून सदर व्यक्तीला भरावे लागणार आहेत.

कर्ज म्हणून घेतलेली मूळ रक्कम आणि त्यावरील व्याज असे एकूण 18 लाख 61 हजार 707 रुपये सदर व्यक्तीला बँकेकडे भरावे लागणार आहेत.

Leave a Comment