Reliance Jio : रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांसाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. जर तुमचेही रिलायन्स जिओचे सिम असेल तर ही बातमी नक्कीच शेवटपर्यंत वाचा. खरेतर, रिलायन्स जिओ ही देशातील एक प्रमुख टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीमुळे वोडाफोन-आयडिया, एअरटेलचे धाबे दणाणले आहेत. रिलायन्स जिओ ही सध्या स्थितीला देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओचे करोडो ग्राहक आहेत.
दिवसेंदिवस ग्राहक संख्येत वाढ होत आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांसाठी सातत्याने वेगवेगळे प्लॅन लॉन्च केले जात आहेत. कमी पैशात अधिकचे बेनिफिट देण्याचा प्रयत्न कंपनीकडून केला जात आहे. वाढत्या कॉम्पिटिशनमुळे कंपनीने अनेक स्वस्त प्लॅन बाजारात लाँच केले आहेत. दरम्यान, आज आपण रिलायन्स जिओच्या अशाच एका स्वस्त प्लानची माहिती जाणून घेणार आहोत.
आज आपण 179 रुपयाच्या प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग एसएमएस आणि इंटरनेट डेटाचा फायदा ग्राहकांना मिळतो. अशा परिस्थितीत आता आपण या प्लॅनची संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात पाहणार आहोत.
कसा आहे 179 चा रिचार्ज प्लॅन ?
जर तुम्हाला स्वस्तात चांगले बेनिफिट हवे असतील तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट ठरणार आहे. या प्लॅनसाठी तुम्हाला 24 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. या 24 दिवसाच्या कालावधीत तुम्हाला दिवसाला 1 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच 24 जीबी डेटा या प्लॅन सोबत तुम्हाला मिळेल. याशिवाय, तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा ऑप्शन मिळणार आहे. शिवाय तुम्हाला दिवसाला 100 एसएमएस मोफत मिळतात.
म्हणजे जर तुम्हाला एसएमएस करायचे असतील तर एका दिवसात शंभर एसएमएस करता येऊ शकतात. याशिवाय जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड याचे सबस्क्रीप्शन देखील तुम्हाला या प्लॅन सोबत मोफत मिळणार आहे. हा प्लॅन 209 रुपयांच्या प्लॅन सारखाच आहे. मात्र या प्लॅनमध्ये तुम्हाला 24 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते.
जेव्हा तुम्ही 209 रुपयांच्या प्लॅनने रिचार्ज करता तेव्हा तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. याशिवाय जिओचा 149 रुपयांचा आणखी एक स्वस्त प्लॅन आहे. मात्र या 149 रुपयांच्या प्लॅन सोबत तुम्हाला फक्त 20 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते.
या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 179 रुपयात जेवढे बेनिफिट मिळत आहेत तेवढे सर्व बेनिफिट मिळतात. परंतु व्हॅलिडीटी ही 20 दिवसांचीच राहते. यामुळे जर तुम्हाला वीस दिवसांसाठीच रिचार्ज करायचा असेल तर तुम्ही 149 रुपयांच्या प्लॅनने देखील रिचार्ज करू शकता.