Rice Farming : भारतात प्रामुख्याने तीन हंगामात शेती केली जाते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात शेतकरी बांधव विविध पिकांची लागवड करत असतात. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. जरी राज्यात अद्याप सर्वत्र मानसून पोहोचलेला नसला तरीही खरीप हंगामाच्या पीक पेरणीपूर्वीची सर्व तयारी शेतकऱ्यांनी पूर्ण करून ठेवलेली आहे.
आता शेतकरी बांधव केवळ मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहेत. पेरणी योग्य मौसमी पाऊस झाला की लगेचच शेतकरी बांधव खरीप हंगामातील पीक पेरणीला सुरुवात करतील आणि शेत शिवारात शेतकऱ्यांची धावपळ पाहायला मिळणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर खरीप हंगामामध्ये संपूर्ण भारत वर्षात भात या पिकाची शेती केली जाते.
भात एक पारंपारिक पीक असून या पिकाची राज्यातही मोठ्या प्रमाणात लागवड होते. या पिकाची शेती मात्र गेल्या काही दशकांपासून शेतकऱ्यांसाठी तोट्याची सिद्ध होत आहे. याचे कारण म्हणजे धानाच्या पिकातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही शिवाय या पिकाला अधिकचा उत्पादन खर्च लागतो. कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती, इंधनाचे वाढलेले दर, वाढलेली मजुरी, घटलेली उत्पादकता या सर्व पार्श्वभूमीवर धान पिकाची लागवड शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे सांगितले जात आहे.
अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांना धान पिकातून अधिकचे उत्पादन मिळाले तर कदाचित भात पिकाची लागवड फायदेशीर ठरू शकते. अशातच बिहार येथील पुसा कृषी विज्ञान केंद्र येथे धानाच्या नवीन दोन जाती विकसित झाल्या आहेत. या कृषी विज्ञान केंद्रात राजेंद्र विभूती आणि राजेंद्र श्वेता या दोन भाताच्या जाती विकसित झाल्या आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या जातीच्या विशेषता अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राजेंद्र विभूती आणि राजेंद्र श्वेता जातीच्या विशेषता थोडक्यात
या जाती अलीकडे विकसित झालेल्या सुधारित जाती आहेत. या जातींची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कमी पाण्यात या जातीतून उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. यामुळे ज्या भागात पाण्याची पातळी कमी होत चालली आहे अशा भागात या जातीचे भात पीक फायदेशीर ठरू शकते. कमी पाणी असले तरी देखील या भाताच्या जाती अधिक दिवस हिरव्यागार राहतात. विशेष बाब म्हणजे या जाती कमी दिवसात उत्पादन देतात. हेक्टरी चार क्विंटल पर्यंतचे उत्पादन या जातीपासून शेतकऱ्यांना मिळू शकते असा दावा केला जातो.