Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाची उभारणी केली जात आहे. समृद्धी महामार्ग म्हणजेच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वर्तमान वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे.
या प्रकल्पासाठी फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्याच पुढाकारातून या प्रकल्पाचे आतापर्यंतचे काम जलद गतीने पूर्ण होऊ शकले आहे. या प्रकल्पांतर्गत आत्तापर्यंत फेज एकचे काम पूर्ण झाले असून फेज दोन हा आंशिक स्वरूपात सुरू झाला आहे.
फेज दोन मधील काही पॅकेजमधील काम अवघड असल्याने हा फेज दोन आंशिक स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आज आपण या महामार्गाचे काम कुठे पर्यंत आले आहे या मार्गाचे काम केव्हा पूर्ण होणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग
समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. हा महामार्ग राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडतो. या मार्गामुळे विदर्भाची मुंबईकडील कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत मिळणार आहे.
हा मार्ग महाराष्ट्रात समृद्धी आणणार असा आशावाद शासन व्यक्त करत आहे. या मार्गाची लांबी पाहता याचे काम एकूण 16 पॅकेज मध्ये पूर्ण केले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा मार्ग दोन फेजमध्ये बांधला जाणार होता. पहिला फेज हा 520 किलोमीटर लांबीचा असणार असे प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये नमूद आहे.
पहिला फेज हा नागपूर ते शिर्डी दरम्यानचा आहे. हा पहिला फेज गेल्यावर्षी अर्थातच डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. याचाच अर्थ पहिल्या फेजचे काम प्रोजेक्ट रिपोर्टनुसारच झाले आहे. तसेच या मार्गाचा शिर्डी ते आमने हा ऍज पर प्रोजेक्ट प्लॅन दुसरा फेज आहे.
पण या दुसऱ्या फेजमधील 13 ते 16 या पॅकेज मधील 14 हा पॅकेज वगळता जवळपास सर्वच पॅकेज मधील कामे बाकी असल्याने या दुसऱ्या फेजमधील काही भाग नुकताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सुरू करण्यात आला आहे.
या फेज दोन मधील शिर्डी ते भरवीर दरम्यानचा अर्थातच शिर्डी ते सिन्नर मधील भरवीर दरम्यानचा टप्पा सामान्य प्रवाशांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते लोकार्पित करण्यात आला आहे. हा आंशिक स्वरूपात सुरू झालेला फेज दोन मधील शिर्डी ते भरविरचा टप्पा 80 किलोमीटर लांबीचा आहे.
अर्थातच आजच्या घडीला नागपूर ते भरवीर पर्यंतचा समृद्धी महामार्ग सामान्य प्रवाशांसाठी सुरू आहे. विशेष म्हणजे उर्वरित मार्गातील काम देखील जलद गतीने पूर्ण केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाच पॅकेज 13, पॅकेज 15 आणि पॅकेज 16 या पॅकेज मधील कामे बाकी आहेत. पॅकेज 14 चे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे उर्वरित तीन पॅकेज मधील कामे देखील युद्ध पातळीवर सुरू आहेत.
काही ठिकाणी मोठ्या उड्डाणपुलाचे, व्हायडाकटचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी बोगद्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या मार्गाचे काम पूर्ण केले जात असून या मार्गाचा बाकी राहिलेला 101 एक किलोमीटर लांबीचा भाग म्हणजेच पॅकेज 13 पॅकेज 14 पॅकेज 15 आणि पॅकेज 16 देखील लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.
अशातच काही दिवसांपूर्वी एका मीडिया रिपोर्ट मध्ये या मार्गाचे बाकी राहिलेले काम मे 2024 पर्यंत पूर्ण होईल आणि यानंतर हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू होईल असा दावा करण्यात आला होता. खरतर हा मार्ग या चालू वर्षाच्या अखेरपर्यंतच सुरू होणार असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सांगितले गेले होते. परंतु, या मार्गाचा शेवटच पॅकेज अर्थातच पॅकेज 16 मध्ये काही कामे आव्हानात्मक असल्याने याला उशीर होण्याची शक्यता आहे.