Saving Bank Account Interest Rate : अलीकडे गुंतवणुकीसाठी एफडीला विशेष महत्त्व आले आहे. एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू लागला आहे.
अनेक बँकांनी फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील आयसीआयसीआय या प्रायव्हेट सेक्टर मधील दुसऱ्या सर्वात मोठ्या बँकेने एफडीच्या व्याजदरात सुधारणा केली आहे.
तथापि, देशात अशाही अनेक बँका आहेत ज्या एफ डी एवढेच व्याजदर सेविंग अकाउंट मध्ये जमा असलेल्या पैशांसाठी देऊ करत आहेत.
कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही मात्र देशातील काही बँका सेविंग अकाउंट वर आठ टक्क्यांपर्यंतचे व्याज देत आहेत.
दरम्यान आज आपण याच बँकांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
कोणत्या बँका सेविंग अकाउंट साठी देत आहेत सर्वाधिक व्याज
DCB बँक : डीसीबी बँक बचत खात्यावर जमा असलेल्या पैशांसाठी 8% एवढे व्याज देत आहे. यामुळे जर तुमचेही या बँकेत बचत खाते असेल तर तुमच्या बचत खात्यात जमा असलेल्या पैशांसाठी तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे.
बंधन बँक : ही बँक देखील आपल्या ग्राहकांसाठी बचत खात्यावर चांगले व्याज वापर करत आहे. या बँकेकडून मोठ्या डिपॉझिटर ग्राहकांसाठी 8.05% एवढे व्याज दिले जात आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक : ही बँक सेविंग अकाउंट वर 7.50% एवढे व्याज ऑफर करत आहे. अर्थातच या बँकेत जर एखाद्याचे बचत खाते असेल तर त्या खात्यात जमा असलेल्या रकमेवर चांगले व्याज मिळू शकणार आहे.
RBL : या बँकेकडून सुद्धा बचत खात्यात जमा असलेल्या रकमेसाठी चांगले व्याज दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बँक सेविंग अकाउंटमध्ये जमा असलेल्या वेगवेगळ्या गुंतवणुकीवर 7.50 टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर करत आहे.
IDFC फर्स्ट बँक : प्रायव्हेट सेक्टर मधील ही बँक आपल्या ग्राहकांना सेविंग अकाउंटवर 7 टक्क्यांपर्यंतचे व्याज ऑफर करत आहे.