Saving Bank Account Rule : आजकाल प्रत्येकाचे बँकेत खाते आहे. बँक खाते असणे ही काळाची गरज झाली आहे. अगदी तळागाळातील नागरिक देखील बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. काही लोकांचे तर एकापेक्षा जास्त बँक अकाउंट आहेत. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी बँकेत अकाउंट असणे आवश्यक आहे.
बँक अकाउंट मध्ये आपले पैसे सुरक्षित राहतात यासोबतच बँकेत ठेवलेल्या पैशांवर व्याजही मिळते. काहीजण बँकेत एफडी देखील करतात.
सेविंग अकाउंट मध्ये असलेल्या पैशांवर देखील बँकेकडून एक ठराविक इंटरेस्ट रेटने व्याज दिले जाते. बँक खात्यामुळे आपले पैसे तर सुरक्षित राहतातच शिवाय यावर आपल्याला व्याजही मिळते.
आपल्यापैकी अनेकजन आपली लाखो रुपयांची बचत बँक खात्यात ठेवतात, पण तुम्हाला बँक अकाउंट मध्ये जास्तीत जास्त किती रक्कम ठेवता येते? यासंदर्भात काय नियम आहेत याविषयी माहिती आहे का? नाही मग आज आपण याच नियमांची माहिती जाणून घेणार आहोत.
सेविंग अकाउंट मध्ये किती पैसे ठेवले जाऊ शकतात
अनेकांचे बँकेत सेविंग अकाउंट असते. मात्र बँकेच्या या बचत खात्यात किती रक्कम ठेवता येते ? असा सवाल उपस्थित केला जात होता. तर आम्ही आपला सांगू इच्छितो की ग्राहक आपल्या बचत खात्यात म्हणजेच सेविंग अकाउंट मध्ये त्यांना हवी तेवढी रक्कम ठेवू शकतात.
सेविंग अकाउंट मध्ये किती रक्कम असायला हवी याबाबत कोणतेच लिखित नियम नाही आहेत. पण जर तुम्ही आयकर भरण्यास पात्र असाल तर तुम्हाला तुमच्या रकमेची माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार आहे.
सेविंग अकाउंट मध्ये किती कॅश आहे याची माहिती तुम्हाला आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. तसेच यावर तुम्हाला आयकर देखील द्यावा लागणार आहे. आयटी विभागाकडे आपल्या बँक खात्यात रोख रक्कम जमा झाल्याची माहिती असते.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने कोणत्याही बँकेला एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख ठेवींची माहिती देणे बंधनकारक केले आहे.
10 लाख रुपयांची हीच मर्यादा FD मध्ये रोख ठेवी, म्युच्युअल फंड, बाँड आणि शेअर्समधील गुंतवणूक आणि ट्रॅव्हलर्स चेक, फॉरेक्स कार्ड इत्यादी परदेशी चलनाच्या खरेदीसाठी देखील लागू होते.
अर्थातच तुम्ही तुमच्या बँक खात्यात एका आर्थिक वर्षात दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम डिपॉझिट केली तर तुम्हाला आयकर विभागाला माहिती द्यावी लागणार आहे.