SBI Bank News : एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. देशात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहे. यामध्ये एसबीआय बँकेचा समावेश होतो. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एसबीआय ही सर्वात मोठी बँक असल्याचा दावा केला जातो.
एसबीआयकडून आपल्या ग्राहकांच्या खात्यातून काही रक्कम कपात केली जात आहे. त्यामुळे जर तुम्हीही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष महत्त्वाची राहणार आहे.
खरेतर गेल्या काही दिवसांपासून एसबीआय बँकेच्या ग्राहकांकडून अकाउंटमधून काही पैसे कट झाल्याची तक्रार केली जात होती.
एसबीआय ग्राहकांच्या अकाउंटमधून 147.50 रुपयांची कपात होत आहे. याचे एस एम एस देखील ग्राहकांना प्राप्त होत आहेत.
त्यामुळे सध्या स्थितीला एसबीआयच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपल्यासोबत काही मोठी ठगी तर होणार नाही ना यामुळे एसबीआयचे ग्राहक चिंतेत आहे.
नेमके पैसे काबर कट होत आहेत हे सर्वसामान्यांना कळत नाहीये. दरम्यान याचबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया ने मोठी माहिती दिली आहे.
एसबीआय ने दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय बँकेच्या ग्राहकांकडून एटीएम कार्डच्या मेंटेनन्ससाठी सदर शुल्क आकारले जात आहे. यामुळे ग्राहकांच्या अकाउंट मधून 147.50 रुपयांची कपात केली जात आहे.
ही कपात एटीएम कार्डच्या मेंटेनन्ससाठी असून यामुळे ग्राहकांनी घाबरून जाण्याचे काहीही एक कारण नसल्याचे बँकेने स्पष्ट केले नाही. खरेतर यासाठी वार्षिक फक्त 125 रुपये शुल्क आकारले जाते. मात्र यासाठी जीएसटी देखील द्यावी लागते.
यामूळे बँकेकडून 125 रुपये एटीएम मेंटेनन्स चार्जेस आणि यासाठीचे जीएसटी चार्जेस असे एकूण 147.50 रुपयांची कपात केली जात आहे.
म्हणून जर तुमच्याही खात्यातून 147.50 रुपयांची कपात झाली असेल आणि याचा एसएमएस तुम्हाला प्राप्त झाला असेल तर तुम्ही अजिबात चिंता करण्याचे काही कारण नाही हे पैसे एसबीआयनेच कपात केलेले आहेत. तुमच्यासोबत कोणत्याच प्रकारची सायबर ठगी झालेली नाही यामुळे तुम्ही निश्चिंत राहा.