SBI Bank Personal Loan Interest Rate : अचानक पैशांची गरज उद्भवली तर आपल्यापैकी अनेकजण बँकेकडून वैयक्तिक कर्ज काढण्याचा विचार करतात. देशभरातील प्रमुख बँका आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहेत. एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक देखील आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज देत आहे.
दरम्यान आज आपण एसबीआय बँकेच्या वैयक्तिक कर्जाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर एसबीआय बँक आपल्या काही ग्राहकांना इतर ग्राहकांच्या तुलनेत कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत आहे.
एसबीआय बँकेकडून सैन्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तथा सरकारी कर्मचाऱ्यांना इतर ग्राहकांच्या तुलनेत कमी इंटरेस्ट रेट मध्ये वैयक्तिक कर्ज पुरवले जात आहे.
या लोकांना मिळते सर्वात कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज
मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआय बँक डिफेन्स फोर्सेस मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 11.15% ते 12.65% या इंटरेस्ट रेटमध्ये वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे.
तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना 11.30% ते 13.80% या इंटरेस्ट रेटमध्ये वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच ज्या व्यक्तींचे एसबीआय बँकेत सॅलरी अकाउंट आहे त्या ग्राहकांना बँकेकडून 11.15% ते 11.65% या इंटरेस्ट रेटमध्ये पर्सनल लोन दिले जात आहे.
याशिवाय ज्या व्यक्तींचे दुसऱ्या बँकेत सॅलरी अकाउंट आहे मात्र त्यांना एसबीआयकडून पर्सनल लोन हवे आहे अशा लोकांना एसबीआय बँकेकडून 11.40% ते 11.90% या इंटरेस्ट रेटमध्ये वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
व्याजदर क्रेडिट स्कोरवर डिपेंड असतो
पर्सनल लोनसाठी आकारला जाणारा व्याजदर हा ग्राहकांच्या सिबिल स्कोर वर अवलंबून असतो. ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना बँकेकडून कमी इंटरेस्ट रेटमध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर हा 800 च्या आसपास आहे अशा व्यक्तींना बँकेच्या माध्यमातून लो इंटरेस्ट रेट मध्ये पर्सनल लोन मिळते.
SBI बँकेकडून 3 लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतल्यास किती व्याज द्यावे लागेल
जर तुम्ही SBI कडून 3 वर्षांसाठी 11.15% दराने 3 लाख रुपये वैयक्तिक कर्ज घेतल्यास तुम्हाला 9,843 रुपयांचा मासिक EMI भरावा लागणार आहे. या कर्जासाठी तुम्हाला एकूण 54,346 रुपये व्याज द्यावे लागणार आहे.