पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! Pune रेल्वे स्टेशनवरील प्रवास होणार सोपा, रेल्वेचा ‘हा’ निर्णय ठरणार गेमचेंजर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. याचे कारण म्हणजे हा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात विस्तारलेले आहे. यामुळे भारतात कुठेही जायचे असले तरी देखील रेल्वे गाडी उपलब्ध असते.

यामुळे जेव्हा-केव्हा लांब पल्ल्याच्या प्रवासाचा विषय निघतो तेव्हा रेल्वेलाच प्राधान्य दिले जाते. यामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. विशेष बाब अशी की आगामी काळात ही संख्या आणखी वाढणार आहे.

अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध निर्णय घेतले जात आहेत. प्रवाशांसाठी वंदे भारत एक्सप्रेस सारखी हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे.

तसेच, नवनवीन रेल्वे मार्ग देखील विकसित केले जात आहेत. अशातच आता पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुढील दोन दशकाचा विचार करून आता पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार केला जाणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर नवीन फलाट तयार केले जाणार आहेत तसेच सध्या अस्तित्वात असणाऱ्या फलाटची लांबी देखील वाढवली जाणार आहे. विशेष म्हणजे याबाबतचा प्रस्ताव तयार झाला असून हा प्रस्ताव पुणे विभागाने मंजुरीसाठी सेंट्रल रेल्वे कडे पाठवला आहे.

या प्रस्तावानुसार, पुणे रेल्वे स्थानकावर ७५० मीटर लांबीचे नवीन ४ फलाट व लोकलसाठी सुमारे ६०० मीटर लांबीचे २ नवीन फलाट बांधले जातील. हे फलाट जुन्या मालधक्क्याच्या जवळ असलेल्या जीएल (गुड्स लूप) लाइनच्या जागेत बांधले जाणार आहेत.

खरे तर सध्या स्थितीला या स्थानकात ६ फलाट आहेत. आता येथे नवीन ६ फलाट बांधण्याची योजना आहे. म्हणजे भविष्यात या स्थानकावर १२ फलाट पाहायला मिळतील. यातील १० फलाट हे मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी वापरले जाणार आहेत आणि २ फलाट हे फक्त लोकल ट्रेनसाठी वापरले जाणार आहेत.

सध्या पुणे रेल्वे स्थानकावर फक्त फलाट क्रमांक एक आणि फलाट क्रमांक चार हे दोनच प्लॅटफॉर्म मोठे आहेत. उर्वरित प्लॅटफॉर्म हे लहान आहेत. यामुळे या लहान प्लॅटफॉर्मवर 24 डब्यांची गाडी थांबत नाही.

हेच कारण आहे की जुन्या प्लॅटफॉर्मची लांबी देखील 750 मीटर पर्यंत केली जाणार आहे. यामुळे जुन्या प्लॅटफॉर्मवर देखील भविष्यात 24 डब्यांची गाडी थांबू शकणार आहे.

दरम्यान याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वे कडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर भविष्यात पुणे रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.

Leave a Comment