सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! महागाई भत्ता शून्य झाल्यावर घरभाडे भत्ता पण घटणार का ? तज्ञ म्हणतात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की मार्च 2024 मध्ये अर्थातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता वाढ लागू केली आहे. याचा रोख लाभ मात्र मार्च महिन्याचा पगारासोबत दिला गेला आहे.

अशातच मात्र मीडिया रिपोर्टमध्ये गेल्या काही दिवसांपासून महागाई भत्ता 50 टक्के झाला असल्याने आता महागाई भत्त्याची रक्कम मूळ पगारात ऍड केली जाईल आणि महागाई भत्ता शून्य होईल असा दावा केला जाऊ लागला आहे.

मात्र याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महागाई भत्ता खरच शून्य होणार का याबाबत अजून सरकारकडून कोणतीच घोषणा झालेली नाही. तथापि आज आपण महागाई भत्ता शून्य झाल्यास घरभाडे भत्ता पण बदलणार का या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 50% झाल्यानंतर घरभाडे भत्ता वाढीचा देखील लाभ मिळणार आहे. घर भाडे भत्ता कॅटेगिरी नुसार दिला जातो. सध्या एक्स, वाय आणि झेड कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27, 18 आणि नऊ टक्के असा घरभाडे भत्ता दिला जात आहे.

पण महागाई भत्ता 50% झाल्यानंतर एक्स कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 30 टक्के, वाय कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांना 20 टक्के आणि झेड कॅटेगरी मधील कर्मचाऱ्यांना दहा टक्के असा HRA दिला जाणार असा नियम आहे. पण आता जर महागाई भत्ता शून्य झाला तर घर भाडे भत्ता देखील कमी होणार असे बोलले जात आहे.

महागाई भत्ता शून्य झाल्यास एक्स, वाय आणि झेड कॅटेगिरी मधील कर्मचाऱ्यांचा घर भाडे भत्ता हा अनुक्रमे 24 टक्के, 16 टक्के आणि आठ टक्के असा कमी होणार आहे. तथापि याबाबत अजून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे महागाई भत्ता शून्य होणार का? हे पाहणे खरच उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Comment