FD करणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! 6 महिने ते 1 वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप 10 बँका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD News : प्रत्येकजण कष्टाने कमावलेला पैसा कुठेतरी गुंतवण्याच्या तयारीत असतो. काही लोक सोन्यात गुंतवणूक करतात. तर कोणी रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवतात. याशिवाय अनेकजण असे आहेत जे की बँकेची एफडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना, पोस्ट ऑफिसची एफडी योजना, बँकेची आरडी योजना अशा सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व दाखवत असतात.

दरम्यान आज आपण अशाच सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाची माहिती नजर चालू आहोत. आज आपण एफडी वर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांची माहिती पाहणार आहोत.

यामुळे जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी नक्कीच कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना सहा महिने ते एक वर्ष कालावधीच्या एफ डी मध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.

कारण की आज आपण सहा महिने ते एक वर्ष कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप 10 बँकांची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

सहा महिने ते एक वर्ष कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप 10 भारतीय बँका कोणत्या?

1) बँक ऑफ बडोदा : सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक म्हणून बँक ऑफ बडोदाची ओळख आहे. दरम्यान ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सहा महिने ते एक वर्ष कालावधीच्या एफडीवर 5.60% ते 7.10% यादरम्यान व्याज ऑफर करत आहे.

2) पंजाब अँड सिंध बँक : ही बँक सहा महिने ते एक वर्ष कालावधीच्या एफडी साठी 5.25% ते 7.10% यादरम्यान व्याज देत आहे.

3) पंजाब नॅशनल बँक : सहा महिने ते एक वर्ष कालावधीच्या एफडी साठी पंजाब नॅशनल बँक 6% ते 7.05% यादरम्यान व्याज ऑफर करत आहे.

4) आयडीबीआय बँक : सहा महिने ते एक वर्ष कालावधीच्या एफडीसाठी या बँकेकडून आपल्या ग्राहकांना 5.25% ते 7.05% या रेटने व्याज दिले जात आहे.

5) इंडियन बँक : ही बँक सहा महिने ते एक वर्ष कालावधीच्या एफडीसाठी 3.85% ते 7.05% एवढे इंटरेस्ट रेट देत आहे.

6) कोटक महिंद्रा बँक : सहा महिने ते एक वर्ष कालावधीच्या FD साठी ही बँक सहा टक्के ते सात टक्के या रेटने व्याज देत आहे.

7) सेंट्रल बँक ऑफ इंडिया : ही बँक या कालावधीच्या एफडीसाठी सहा टक्के ते 6.25 टक्के यादरम्यान इंटरेस्ट रेट ऑफर करत आहे.

8) कॅनडा बँक : ही बँक 6.15 ते 6.25% यादरम्यान इंटरेस्ट रेट देत आहे.

9)सिटी युनियन बँक : सहा महिने ते एक वर्ष कालावधीच्या एफडी साठी ही बँक सहा टक्के ते 6.5 टक्के या रेटने व्याज देत आहे.

10) स्टेट बँक ऑफ इंडिया : सहा महिने ते एक वर्ष कालावधीच्या एफडीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया 5.75 टक्के ते सहा टक्के या रेटने व्याज ऑफर करत आहे.

Leave a Comment