एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! सेविंग अकाउंट असलेल्या ग्राहकांसाठी बँकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Bank : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे निर्णय घेत असते. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने आज आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे.

आज एसबीआयने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे बँकेच्या करोडो ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जर तुमचेही एसबीआय बँकेत सेविंग अकाउंट असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बँकेने सेविंग अकाउंट मध्ये जमा असलेल्या ठेवींचे दर वाढवले आहेत. म्हणजे आता एसबीआय बँकेच्या सेविंग अकाउंट मध्ये डिपॉझिट केलेल्या पैशांवर अधिकचे व्याज मिळणार आहे.

निश्चितच, एसबीआयच्या निर्णयामुळे बँकेच्या करोडो ग्राहकांना फायदा होणार आहे. आता आपण एसबीआयने डिपॉझिट रेटमध्ये किती वाढ केली आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

व्याजदर कितीने वाढवले ?

मिळालेल्या माहितीनुसार, आज देशातील या सगळ्यात मोठ्या सरकारी बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठीचे ठेवी दर 0.25 टक्क्यांवरून 0.75 टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहेत.

बँकेच्या माध्यमातून आता सामान्य ग्राहकांना 46 दिवस ते 179 दिवसांच्या ठेवीवर 5.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 6 टक्के या दराने व्याज मिळणार आहे.

तसेच 180 दिवस ते 210 दिवसांच्या ठेवीवर सामान्य ग्राहकांन 6 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.50 टक्के या दराने व्याज मिळणार आहे. 211 दिवसांपासून 1 वर्षाच्या ठेवींवरील व्याजदरही वाढवण्यात आले आहेत.

आता या कालावधीसाठी जमा असलेल्या ठेवीवर सामान्य ग्राहकांना 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के या दराने व्याज मिळणार आहे.

पण, 7 ते 45 दिवसांसाठी ठेवीचा दर हा आधीप्रमाणेच आहे. या कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना 3.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 4 टक्के या दराने व्याज मिळतं आहे.

दुसरीकडे 1 वर्ष ते 2 वर्षांसाठी हे दर 6.80 टक्के, 2 वर्षे ते 3 वर्षांसाठी 7 टक्के, 3 वर्षे ते 5 वर्षांसाठी 6.75 टक्के आणि 5 वर्षे ते 10 वर्षांसाठी 6.50 टक्के एवढे राहणार आहेत.

Leave a Comment