SBI कडून 10.30 लाखाचे कार लोन घेतले तर कितीचा हफ्ता भरावा लागणार ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Car Loan : तुम्हीही कार घेण्याच्या तयारीत आहात का ? हो, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. विशेषतः जर तुम्हाला टाटा कंपनीची Nexon कार खरेदी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.

कारण की आज आपण नेक्सॉन Pure कारसाठी एसबीआय या बँकेकडून 10.30 लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास ग्राहकांना कितीचा हप्ता भरावा लागेल याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

Nexon ची किंमत

टाटा ही देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक कार ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये टाटा नेक्सॉन या कारचा देखील समावेश होतो.

या कारच्या किमती बाबत बोलायचं झालं तर या गाडीच्या किमती 8.15 लाख रुपयांपासून ते 15.60 लाख रुपयांपर्यंत जातात.

Nexon Smart 8.15 लाख, Smart Plus 9.20 लाख, Nexon Pure 9.80 लाख, Smart Plus S 9.80 लाख, Nexon Pure S 10.30 लाख, Nexon Creative 11.10 लाख, शुद्ध डिझेल 11.10 लाख आणि Nexon Di Fearless AMT गाडीची किंमत 15.10 लाख, Nexon Creative DT AMT 11.90 लाख, Nexon Creative DCA 12.30 लाख, Nexon Creative डिझेल 12.50 लाख, Nexon Fearless DT 12.60 NE लाख, Nexon Creative Diesel AMT ची किंमत 13.10 लाख रुपये एवढी आहे.

एसबीआयचे कार लोनचे व्याजदर

एसबीआय बँकेकडून पाच वर्षांसाठी घेतलेल्या कार लोन साठी ग्राहकांकडून नऊ टक्क्यांपर्यंतचे व्याज आकारले जात आहे.

अशा परिस्थितीत, जर समजा एखाद्या ग्राहकाने Tata Nexon Pure ही कार खरेदी करण्यासाठी पाच वर्षांच्या कालावधी करिता 10.30 लाख रुपयांचे कर्ज घेतले तर सदर ग्राहकाला नऊ टक्के व्याजदर आणि 21,381 रुपये एवढा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

जर समजा एखाद्या ग्राहकाने 15.10 लाख रुपये किंमत असलेली नेक्झॉन खरेदी केली तर त्याला 31 हजार 345 रुपये एवढा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

Leave a Comment