SBI FD Interest Rate : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते. एसबीआयकडून आपल्या ग्राहकांना स्वस्त व्याजदरात गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, सुवर्ण कर्ज, वाहन कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
एवढेच नाही तर एसबीआयकडून बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना देखील चांगला परतावा दिला जात आहे. दरम्यान आज आपण एसबीआयच्या चारशे दिवसांच्या एफडी योजनेबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने एफडीच्या चारशे दिवसांच्या एफडी योजनेत 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर अशा गुंतवणूकदाराला किती रिटर्न मिळणार या विषयी आज आपण अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया एसबीआयच्या चारशे दिवसांच्या एफडी योजनेविषयी सविस्तर माहिती.
एसबीआयच्या 400 दिवसांची FD योजना
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील एक अग्रगण्य पब्लिक सेक्टर बँक आहे. देशात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत. या 12 सार्वजनिक बँकांमध्ये एसबीआयचा देखील समावेश होतो.
विशेष म्हणजे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एसबीआय सर्वात मोठी बँक आहे. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी 400 दिवसांची विशेष एफडी योजना सुरू केली आहे.
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसबीआयच्या चारशे दिवसांच्या एफडी योजनेसाठी बँकेकडून 7.1% एवढे व्याजदर ऑफर केले जात आहे.
मात्र या योजनेत ज्येष्ठ गुंतवणूकदारांनी जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांना 7.60% एवढे व्याजदर दिले जात आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अधिकचे व्याजदर बँकेकडून ऑफर होत आहे.
400 दिवसांच्या एफडीमध्ये 3 लाख गुंतवले तर
जर एखाद्या गुंतवणूकदाराने एसबीआयच्या या 400 दिवसांच्या एफडीमध्ये तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर सदर गुंतवणूकदाराला मॅच्युरिटीवर 3 लाख 23 हजार रुपयांचा परतावा मिळणार आहे.
म्हणजेच गुंतवणूकदाराला या एफडी योजनेतून 23 हजार रुपये एवढे व्याज मिळणार आहे. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांनी या एफडी योजनेत तीन लाख रुपये गुंतवले तर 26,000 एवढे व्याज मिळणार आहे.