SBI HDFC ICICI Bank FD Rate : भारतात फार पूर्वीपासून आपल्याकडील पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवण्यासाठी FD ला विशेष महत्त्व दाखवले जात आहे. अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफडी योजना आणि आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिस ची आरडी आणि एफडी योजना अशा सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व दाखवत आहेत.
तथापि अनेकजण एफडी मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. महिला गुंतवणूकदार देखील मोठ्या प्रमाणात मुदत ठेव योजनेत आपला पैसा गुंतवत आहेत.
पण, एफडी मध्ये पैसा गुंतवू इच्छिणाऱ्या लोकांच्या माध्यमातून कोणत्या बँका एफडीवर सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत याविषयी सातत्याने विचारना होत आहे.
खरंतर अलीकडे देशभरातील विविध बँकांच्या माध्यमातून एफडीवरील इंटरेस्ट रेट मध्ये वाढ करण्यात आली आहे. आता, एफडीमधूनही गुंतवणूकदारांना चांगली कमाई करता येत आहे.
दरम्यान आज आपण एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या तीन प्रमुख बँकांच्या एफडीच्या व्याजदराची तुलना करणार आहोत. यातील कोणती बँक एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहे याविषयी आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
एसबीआय बँकेचे व्याजदर : एसबीआय ही देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक आहे. ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आपल्या ग्राहकांना दोन वर्षांपासून ते तीन वर्ष कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या बँकेच्या माध्यमातून या कालावधीच्या एफडीवर सात टक्के या दराने व्याज दिले जात आहे.
एचडीएफसी बँक : ज्याप्रमाणे एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे त्याचप्रमाणे एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे. ही देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादीत येणारी खाजगी बँक आहे.
ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 18 महिन्यांपासून ते 21 महिने कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे. या बँकेच्या माध्यमातून या कालावधीच्या एफडीवर 7.25% या दराने व्याज दिले जात आहे.
आयसीआयसीआय बँक : ही देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे. या बँकेच्या माध्यमातून 15 महिने ते 18 महिने कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बँक या कालावधीच्या एफडीवर 7.20% या दराने व्याज ऑफर करत आहे.