एसबीआय खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! 50 हजार रुपये महिना पगार असलेल्यांना SBI कडून किती होमलोन मिळणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Home Loan : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना गृह खरेदीसाठी वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकंदरीत घराचे स्वप्न आता महाग झाले आहे.

यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्यापैकी अनेकांनी गृह कर्जाचा आधार घेतलेला असेल. विशेष म्हणजे काही लोक नजीकच्या भविष्यात गृह कर्जाचा विचार करत असतील. अशा परिस्थितीत ही बातमी गृह कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खूपच कामाची राहणार आहे.

कारण की, आज आपण एसबीआयअर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ५०००० रुपये महिना पगार असलेल्यांना किती लाख रुपयांचे गृह कर्ज मंजूर करू शकते याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक

एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातील अर्थातच पब्लिक सेक्टरमधील देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

एसबीआय बँकेकडून आपल्या ग्राहकांना 8.50% इतक्या किमान व्याजदरात गृह कर्ज पुरवले जात आहे. मात्र बँकेकडून कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज हवे असेल तर सिबिल स्कोर हा चांगला असावा लागतो.

750 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असलेल्यांना एसबीआय बँकेकडून कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज पुरवले जात आहे.

किती पगार असलेल्या ग्राहकांना बँकेकडून होम लोन मिळते

मीडिया रिपोर्ट नुसार किमान 25 हजार रुपये पगार असेल तर अशा व्यक्तींना एसबीआय बँकेकडून होम लोन मंजूर होऊ शकते.

अर्थातच महिन्याला 25 हजार रुपये उत्पन्न असलेल्या लोकांना बँकेकडून सहजतेने होम लोन मंजूर होते. मात्र असे असले तरी बँकेकडून होम लोन मंजूर करताना पगारानुसारच होम लोन मंजूर केले जाणार आहे.

50,000 पगार असलेल्यांना किती होम लोन मिळणार ?

बँक बाजारने दिलेल्या माहितीनुसार, महिन्याचा पगार 50 हजार रुपये असलेल्या ग्राहकांना बँकेकडून 33.99 लाख रुपयांपर्यंतचे होम लोन उपलब्ध होऊ शकते. हे कर्ज किमान 8.50% व्याज दरात उपलब्ध होईल.

Leave a Comment