घर खरेदीचे स्वप्न होणार स्वस्तात पुर्ण, SBI देणार ‘इतक्या’ व्याजदरात Home Loan, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Home Loan : तुम्हीही नजीकच्या भविष्यात होम लोन घेण्याचा तयारीत आहात मग तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर, अलीकडे घरांच्या किमती विक्रमी वाढले आहेत आणि हेच कारण आहे की आता गृह खरेदीसाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारला जात आहे.

अनेक जण कर्ज घेऊन घर खरेदी करत आहेत. विशेष म्हणजे रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक देखील आता कर्ज घेऊन घर खरेदी करणे वाईट नसल्याचे म्हणत आहेत. काही अंशी गृह कर्ज फायदेशीर देखील ठरते.

प्रॉपर्टीच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत यामुळे घर खरेदीसाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारणे फायदेशीर असल्याचे मत काही जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे. मात्र गृह कर्ज घेताना सर्वप्रथम विविध बँकांच्या ऑफर्स चेक केल्या पाहिजेत.

जी बँक लो इंटरेस्ट रेटमध्ये कर्ज उपलब्ध करून देत असेल त्याच बँकेकडून कर्ज घेणे ग्राहकांसाठी परवडणारे ठरणार आहे. दरम्यान आज आपण एसबीआय बँकेच्या गृह कर्जाची माहिती जाणून घेणार आहोत.

एसबीआयकडून जर 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले तर किती व्याज भरावे लागू शकते याबाबत देखील आज आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.

SBI बँक Home Loan साठी किती व्याज आकारते

एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या रेटमध्ये गृह कर्ज उपलब्ध करून देते. एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. बँक आपल्या ग्राहकांकडून गृह कर्जासाठी 9.15% ते 9.65% यादरम्यान व्याज वसूल करते.

जर ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेटमध्ये कर्ज हवे असेल तर त्यांचा सिबिल स्कोर चांगला असायला हवा. ज्यांचा सिबिल स्कोर हा 800 च्या आसपास असतो अशा ग्राहकांना कमी इंटरेस्ट रेट मध्ये गृह कर्ज मंजूर होते.

50 लाखाचे कर्ज 25 वर्षांसाठी घेतले तर किती व्याज

जर समजा एखाद्या ग्राहकाला एसबीआय बँकेकडून 50 लाख रुपयांचे कर्ज 25 वर्षासाठी किमान 9.15 टक्के या इंटरेस्ट रेटवर मंजूर झाले तर सदर ग्राहकाला 42 हजार 475 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

म्हणजे या कालावधीत सदर ग्राहकाला 50 लाख रुपयांची मूळ रक्कम आणि व्याज असे एकूण 1 कोटी 27 लाख 41 हजार 600 रुपये भरावे लागणार आहेत. म्हणजे 77 लाख 41 हजार 600 रुपये एवढी रक्कम व्याज म्हणून सदर व्यक्तीला द्यावी लागणार आहे.

Leave a Comment