SBI Personal Loan Details : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेचा संपूर्ण देशात डंका वाजत आहे.
बँकेच्या माध्यमातून आपल्या खातेधारकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. ही बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर चांगले व्याज देते तसेच स्वस्त दरात वाहन कर्ज, गृह कर्ज, पर्सनल लोन, गोल्ड लोन इत्यादी कर्ज पुरवते.
दरम्यान आज आपण एसबीआय बँकेतून पाच लाख रुपयांचे पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज घेतले तर किती रुपयांचा मासिक हप्ता सदर कर्जदाराला भरावा लागू शकतो याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर जाणकार लोक पैशांची खूपच इमर्जन्सी आवश्यकता असेल आणि कुठूनच पैशांची ऍडजेस्टमेंट होत नसेल तरच वैयक्तिक कर्ज घ्यावे असा सल्ला देतात.
जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे, कोणतीही बँक वैयक्तिक कर्जासाठी खूपच अधिकचे व्याजदर आकारते. यामुळे खूपच इमर्जन्सी पैशांची आवश्यकता असेल तरच असे कर्ज काढावे, नाहीतर हे कर्ज न काढलेले बरे अस सांगतात.
दरम्यान आज आपण एसबीआयमधून जर 5 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर अशा कर्जांवर किती रुपयांचा ईएमआय भरावा लागू शकतो याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एसबीआय 11.15 टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्ज पुरवत आहे.
जर तुम्हाला याच व्याजदर पाच लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज मिळाले आणि याची परतफेड पाच वर्षांची ठेवली तर तुम्हाला दहा हजार 909 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागू शकतो.
म्हणजेच या कालावधीसाठी या कर्जाची परतफेड करताना एक लाख 54 हजार रुपयांचे व्याज तुम्हाला भरावे लागणार आहे.
पाच वर्षात तुम्हाला मुद्दल आणि व्याज असे मिळून सहा लाख 54 हजार रुपये भरावे लागणार आहेत. याकरिता दर महिन्याला तुम्हाला दहा हजार 909 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.