SBI Personal Loan : आपल्याला जेव्हा अचानक पैशांची गरज भासते तेव्हा आपण बँकेच्या दरवाजे ठोठावत असतो. बँका एमर्जेंसीमध्ये पर्सनल लोन उपलब्ध करून देतात. वैयक्तिक कारणांसाठी वैयक्तिक कर्ज घेतले जाते.
खरेतर वैयक्तिक कर्ज हे ताबडतोब मंजूर होते यामुळे अनेकजण हे कर्ज घेतात. मात्र जाणकार लोक फारच पैशांची निकड असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज घेतले पाहिजे असा सल्ला देतात.
याचे कारण म्हणजे वैयक्तिक कर्जासाठी आकारले जाणारे व्याजदर. वैयक्तिक कर्जासाठी खूपच अधिक व्याजदर आकारले जाते. यामुळे जेव्हा पैशांची कुठूनच ऍडजेस्टमेंट होत नसेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज घेणे फायद्याचे ठरते.
अनेक बँका ग्राहकांना वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देत असतात. यामध्ये एसबीआय बँकेचा देखील समावेश होतो. एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे.
या बँकेकडून इतरांच्या तुलनेत परवडणाऱ्या व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान, आज आपण एसबीआय बँकेच्या वैयक्तिक कर्जाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
एसबीआय बँक वैयक्तिक कर्जासाठी किती व्याजदर आकारते ?
मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया कडून 11.15 टक्के व्याजदरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. ज्यांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांनाच या किमान व्याजदरात वैयक्तिक कर्ज मिळणार आहे.
ज्यांचा सिबिल स्कोर थोडा कमी असतो त्यांना यापेक्षा अधिकचे देखील व्याज द्यावे लागू शकते. ज्या लोकांचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असतो त्यांना 11.15% या किमान व्याजदरात एसबीआय बँकेकडून वैयक्तिक कर्ज उपलब्ध होऊ शकते.
10 लाखांचे पर्सनल लोन घेतल्यास किती व्याज द्यावे लागेल
आता आपण एसबीआय बँकेकडून 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर किती व्याज भरावे लागू शकते याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
जर एखाद्या व्यक्तीने एसबीआय कडून 11.15% या व्याजदराने दहा लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज पाच वर्षांच्या कालावधीसाठी घेतले तर त्याला 21,817 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे.
सदर व्यक्तीला या कालावधीत तीन लाख 9 हजार 38 रुपये एवढे व्याज भरावे लागणार आहे. अर्थातच सदर व्यक्तीला मूळ रक्कम आणि व्याज असे एकूण 13 लाख 9 हजार 38 रुपये भरावे लागणार आहेत.