SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, RD योजनेसाठी बँकेकडून किती व्याज मिळते ? एसबीआय आरडी फायद्याची आहे का ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI RD Scheme : भारतात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. गुंतवणूकदार अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. मात्र येथील गुंतवणूक ही जोखीम पूर्ण असते यात शंकाच नाही.

परंतु रिस्की गुंतवणूक असली तरी देखील अनेकदा शेअर मार्केट मधून आणि म्युच्युअल फंड मधून गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळतो. यामुळे अनेक जण या रिस्की ठिकाणी गुंतवणूक करतात.

दुसरीकडे भारतात असे अनेक गुंतवणूकदार आहेत जे सुरक्षित गुंतवणूक करण्यास प्राधान्य दाखवतात. कष्टाने कमावलेल्या पैशांचा लॉस होऊ नये यासाठी सुरक्षित गुंतवणुकीला आजही महत्त्व आहे.

सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेच्या एफडी योजना आणि आरडी योजना विशेष लोकप्रिय आहेत. याशिवाय पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना देखील ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. काही लोक सोने आणि चांदी मध्ये देखील गुंतवणूक करतात.

सोने आणि चांदी मध्ये केलेली गुंतवणूक देखील गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देते. दरम्यान आज आपण एसबीआय ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण एसबीआय बँक आरडीसाठी किती व्याज देते याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

SBI बँक आरडीसाठी किती व्याज देते ?

आरडी योजना ही अशी एक गुंतवणुकीची योजना आहे ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम जमा करावी लागते. यासाठी आरडी अकाउंट ओपन करावे लागते.

या अकाउंट मध्ये दर महिन्याला गुंतवणूक केलेल्या गुंतवणुकीवर बँकेकडून व्याज दिले जाते. एसबीआय बँकेच्या माध्यमातून दोन वर्षांपासून ते तीन वर्षांपर्यंतच्या आरडी गुंतवणुकीवर सात टक्क्यांचे व्याज दिले जात आहे.

जर समजा तुम्ही या बँकेत दोन वर्षांकरिता 2500 रुपये प्रति महिना याप्रमाणे RD स्कीममध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटी वर 64 हजार 549 रुपये मिळणार आहेत.

यामध्ये 60 हजार रुपये तुमची गुंतवणूक अमाऊंट राहणार आहे आणि उर्वरित 4,549 रुपये यावरील व्याज अर्थातच रिटर्न राहणार आहे. एकंदरीत एसबीआय बँकेच्या माध्यमातून दोन वर्षांपासून ते तीन वर्षांपर्यंतच्या आरडी योजनेसाठी सात टक्क्यांचे व्याजदर ऑफर केले जात आहे.

Leave a Comment