नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण, शेती वारस नोंद कशी करायची त्याविषयी माहिती घेणार आहोत. शेत ज्या व्यक्तींच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला, तर शेतजमिनीचा हक्क हा कायद्याने वारसांकडे दिला जातो. परंतु त्यासाठी शेती वारस नोंद करणे गरजेचे असते, शेतीवर असणार ऑनलाईन पद्धतीने कशी करायची या संबंधित आपण सविस्तर माहिती येथे जाणून घेऊया.
शेती वारस नोंद in Marathi
शेतजमीन ज्या व्यक्तीच्या नावे आहे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, 3 महिन्याच्या आत शेतजमिनीचा हक्क हा मिळवण्यासाठी शेती वारस नोंद अर्ज करावा लागतो. पूर्वी हीच शेती वारस नोंद प्रक्रिया ऑफलाईन स्वरूपात, तलाठी कार्यालयात जाऊन पूर्ण करावी लागत असे. परंतु बदलत्या तंत्रज्ञानानुसार आता शेती वारस नोंद, ऑनलाईन देखील उपलब्ध झाली आहे. तुम्हाला जर शेत जमिनीचा वारस हक्क मिळवायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या ई हक्क प्रणालीचा वापर करून घरबसल्या शेती वारस नोंद करू शकता.
शेती वारस नोंद ऑनलाईन अर्ज प्रक्रिया Step by step guide in Marathi
जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
वेबसाईट उघडल्यानंतर तेथे तुम्हाला खालच्या बाजूला एक सूचना दिसेल, “७/१२ दुरुस्तीसाठी ई हक्क प्रणाली” त्याखालील https://pdeigr.maharashtra.gov.in लिंक वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
त्यानंतर एक नवीन विंडो उघडेल, ‘पब्लिक डेटा एन्ट्री’ नावाच्या या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला तुमचे अकाउंट बनवावे लागेल.
सर्वप्रथम तुम्ही वेबसाईटवर तुमची नोंदणी करून घ्या, त्यानंतर ID Password Generate झाल्यानंतर लॉगिन करा.
त्यानंतर तुमच्यासमोर अजून एक नवीन डॅशबोर्ड येईल, तेथे काही पर्याय असतील त्यामधील ‘7/12 mutations’ या पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या समोर एक Window येइल, तेथे तुम्हाला User Type Select करायचे आहे. जर तुम्ही सामान्य नागरिक असाल तर, ‘User is Citizen’ निवडा. जर तुम्ही बँक कर्मचारी असाल, तर तुम्हाला ‘User is Bank’ निवडावे लागेल.
त्यानंतर पुढे तुम्हाला Process या बटनावर क्लिक करायचे आहे. तुमच्यासमोर फेरफार अर्ज प्रणाली ई – हक्क नावाचे पेज ओपन होईल.
इथे तुम्हाला तुमच्या गावाचे नाव, जिल्हा, तालुका अशी माहिती भरायची आहे. सोबतच ज्या तलाठ्याकडे अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला वारस नोंद करायची असल्यामुळे वारस नोंद हा पर्याय निवडावा लागेल.
पुढे तुमच्यासमोर वारस फेरफार अर्ज ओपन होईल, सुरुवातीला येथे तुम्हाला अर्जदाराचे संपूर्ण माहिती द्यायची आहे. त्यानंतर ‘पुढे जा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
क्लिक केल्यानंतर समोर एक Pop up येईल, त्यामध्ये अर्जाचा क्रमांक दिलेला असेल. त्याला Ok क्लिक करायचे आहे.
मग पुढे मृत व्यक्तीचे नाव खाते क्रमांक अशी सर्व माहिती फॉर्ममध्ये भरायची आहे. आणि खातेदार शोधा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
खातेदार निवडल्यानंतर, व्यक्तीचा खाते क्रमांक गट क्रमांक निवडायचा आहे. आणि मग मृत्यू दिनांक टाकायचा आहे, माहिती भरून झाल्यानंतर समाविष्ट करा यावर क्लिक करायचे आहे.
तुमच्यासमोर शेतीसंबंधीची सर्व माहिती येईल, तेथे तुमच्यासाठी प्रश्न येईल. अर्जदार हा वारसांपैकी आहे का? तुम्हाला तेथे होय, नाही असे पर्याय निवडायचे आहेत.
त्यानंतर वारसांची नावे भरा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. इथं आता तुम्हाला वारस म्हणून जी नावं लावायची आहेत, त्यांची माहिती भरायची आहे. वारसाचे संपूर्ण नाव, धर्म सोबतच त्यांचे इंग्रजी मध्ये नाव जन्मतारीख फॉर्म मध्ये भरायचे आहे. सूचनेनुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या परिसराचा पिन कोड टाकायचा आहे सोबतच गावाचे नाव तालुका हे पण तेथे टाकायचे आहे.
त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे मयताशी वारस म्हणून जो अर्जदार अर्ज करतोय, त्यांचा संबंध काय आहे हे टाकायचे आहे. मग फॉर्म Save करायचा आहे.
पुढे तुम्हाला वारसा संदर्भात माहिती दिसून येईल, येथे तुम्ही दुसऱ्या वारसाचे नाव नोंदवायची असेल तर ते देखील करू शकता.
फॉर्ममध्ये पुढे तुम्हाला आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, यामध्ये ओळखपत्र तसेच मृत्यू प्रमाणपत्र रेशन कार्ड सोबतच 7/12 हे पण अपलोड करायचे आहेत.
त्यानंतर तुमच्यासमोर एक स्वयंघोषणापत्र येते ते तुम्हाला Accept करायचे आहे. यामध्ये तुम्हाला वारस नोंदी संदर्भातील सर्व कायद्यांचे पालन करण्यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.
त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे, अशा रीतीने तुमचा वारस नोंदी संबंधीचा अर्ज तलाठी कार्यालयाकडे पाठवला जाईल. काही कालावधीनंतर सातबारावर वारसाची नोंद करण्यात येईल.
तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी शेती वारस नोंदी संबंधीची माहिती, मला आशा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.