Skymet Havaman Andaj : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल पहायला मिळत आहे. सातत्याने हवामानात होणारा बदल शेती पिकांसाठी मात्र घातक ठरत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला. तत्पूर्वी मान्सून मध्ये कमी पाऊस झाला.
दरम्यान या नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा अवकाळी पावसाने झाली. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. आता मात्र गेल्या आठवड्याभरापासून उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढू लागला आहे.
आपल्या महाराष्ट्रात देखील थंडीची तीव्रता आधीच्या तुलनेत अधिक झाली आहे. वाढत्या थंडीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. अशातच आता हवामान खात्याने थंडीचा जोर कमी होणार असल्याचे सांगितले आहे.
तसेच स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने महाराष्ट्रासह देशातील 11 राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. स्कायमेट ने म्हटल्याप्रमाणे 25 जानेवारी ते 28 जानेवारी 2024 पर्यंत महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात पावसाची शक्यता आहे.
Skymet म्हणतंय की, पर्वतीय भागात बर्फवृष्टी होणार असा अंदाज आहे. पण काही राज्यांमध्ये दाट धुके आणि थंडीची लाट येणार अशी शक्यता आहे.
28 जानेवारीपर्यंत देशातील छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील काही ठिकाणी हलका पाऊस पडेल असा अंदाज यावेळी देण्यात आला आहे.
तसेच पश्चिम बंगाल, दक्षिण झारखंड, ओडिशाचा काही भाग, छत्तीसगड आणि विदर्भ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टी भागात पाऊस पडणार अशी शक्यता आहे.
अंदमान आणि निकोबार बेटांवरदेखील पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे पावसाचा जोर उद्यापासून आणखी वाढणार आहे.
उद्या 26 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान चांगला मोठा पाऊस पडेल असा अंदाज देण्यात आला आहे. याशिवाय आपल्या महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील विदर्भ विभागासहितच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रमध्ये देखील अवकाळी पावसाची शक्यता स्कायमेटच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.