Small Business Idea Marathi : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय तरुणांची मानसिकता पूर्णपणे बदलली आहे. आता तरुणांचा कल सरकारी नोकरीकडे वाढला आहे. तरुणांना एकतर सरकारी नोकरी हवी आहे नाहीतर मग स्वतःचा व्यवसाय थाटायचा आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे खाजगी क्षेत्रात अलीकडे मोठी अनिश्चितता पाहायला मिळत आहे. गुगल सारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार वर्गांमध्ये आता कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
एकंदरीत आता नोकरीमध्ये शाश्वती राहिलेली नाही. हेच कारण आहे की आता नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. तर अनेकांना नोकरीमध्ये मिळत असलेला पगार कमी वाटू लागला आहे.
त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी अनेकजण आता नोकरी सोबतच पार्ट टाइम व्यवसाय करू लागले आहेत. तर अनेकांना व्यवसाय करण्याची इच्छा असते मात्र कोणता व्यवसाय करावा हे सुचत नाही.
दरम्यान आज आपण अशाच तरुणांसाठी एका भन्नाट बिजनेस आयडिया बाबत माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण एका हंगामी बिझनेस बाबत जाणून घेणार आहोत. खरंतर अलीकडे बारा महिने चालणाऱ्या व्यवसायांसोबतच पार्ट टाइम चालणारे व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केले जाऊ लागले आहेत.
हिवाळा, उन्हाळा तसेच पावसाळा या ऋतूनुसार वेगवेगळे व्यवसाय केले जात आहेत. सध्या देशभरात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. अशा परिस्थितीत या थंडीच्या काळामध्ये गरम कपड्यांचा व्यवसाय सुरू केला तर चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे.
गरम कपड्यांचा अर्थातच स्वेटर, स्वेट शर्ट, टोपी, ग्लोवज, मफलर इत्यादी कपडे विक्रीचा व्यवसाय या दोन ते तीन महिन्यांच्या काळात चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकणार आहे. अवघ्या दोन ते तीन महिन्यांच्या काळात या व्यवसायातून बारा महिन्यात जेवढी कमाई होऊ शकते तेवढी कमाई करता येणार आहे.
तुम्ही हा व्यवसाय दोन स्तरावर सुरू करू शकता. जर तुमच्याकडे बऱ्यापैकी भांडवल असेल तर तुम्ही व्यवसाय होलसेल मध्ये सुरू करू शकता. किंवा तुम्ही होलसेल मधून गरम कपडे खरेदी करून ते किरकोळ बाजारात विक्री करू शकता.
यासाठी तुम्हाला एक गाळा भाड्याने घेऊन दुकान सुरू करावे लागणार आहे. किंवा तुम्ही बाजारपेठेत स्टॉल लावून देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला दोन ते तीन लाखापर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते.
पण जर तुम्हाला हा व्यवसाय थोड्या मोठ्या स्तरावर सुरू करायचा असेल तर तुम्हाला पाच ते सात लाखांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. यासाठी तुम्हाला मुंबई पुणे अहमदाबाद सुरत पंजाब हरियाणा राजस्थान येथून माल खरेदी करावा लागणार आहेत. या व्यवसायातून तुम्हाला 30 ते 40 टक्के एवढा मार्जीन मिळणार आहे.