एक रुपयाचीही गुंतवणूक न करता सुरु करता येतो ‘हा’ व्यवसाय ! महिन्याला होऊ शकते हजारो रुपयांची कमाई, कसं ते वाचाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Small Business Idea : अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. तर काही प्रसंगी नोकरी मिळत नसल्याने व्यवसाय करणे भाग पडत आहे. विशेषता कोरोना पासून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

विशेष असे की व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा देखील मिळू लागला आहे. मात्र असे असले तरी अनेकांना भांडवल अभावी व्यवसाय सुरू करता येत नाही. अनेक तरुण भांडवल नसल्याने इच्छा असूनही व्यवसाय करता येत नसल्याच्या तक्रार करत आहेत.

अशा परिस्थितीत आज आम्ही खास अशा तरुणांसाठी एक भन्नाट बिजनेस प्लॅन घेऊन हजर झालो आहोत. आज आम्ही अशा व्यवसायाबाबत माहिती देणार आहोत ज्यामध्ये एक रुपयाचीही गुंतवणूक करावी लागणार नाही. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या भन्नाट बिजनेस आयडिया बाबत.

कोणता आहे तो व्यवसाय ?

आज आम्ही ज्या व्यवसायाबाबत माहिती देणार आहोत तो व्यवसाय आहे वैद्यकीय कुरिअर सेवा. हा एक सर्विस बिजनेस राहणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक बाईकची आवश्यकता असेल आणि एक स्मार्टफोन लागणार आहे. जनरली या दोन्ही गोष्टी तरुण वर्गाकडे सहज उपलब्ध असतात.

यामुळे या व्यवसायात सुरुवातीला एकही रुपया लावावा लागणार नाही. हा बिजनेस सर्विस रिलेटेड असल्याने इथे तुमचे श्रमच तुम्हाला पैसा मिळवून देणार आहे. पण हा व्यवसाय ग्रामीण भागात म्हणावा तसा चालणार नाही परंतु शहरी भागात या व्यवसायाला चांगला स्कोप राहू शकतो.

कसा सुरू करणार व्यवसाय

हा व्यवसाय तुम्ही भारतातील कोणत्याही शहरात सुरु करू शकता. तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्ही तुमच्या गावापासून जवळ एखादे मोठे शहर असेल तर तिथे जाऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. खरंतर हा व्यवसाय एक सर्विस बिजनेस आहे. म्हणजे तुम्हाला येथे लोकांना सर्विस द्यायची आहे.

ही सर्विस वैद्यकीय कुरिअर सर्विस राहणार आहे. यामध्ये तुम्हाला क्लाइंटला मेडिकल मधील औषधे घरपोच करायची आहेत. यासाठी क्लायंटकडून डॉक्टरांची प्रिस्क्रीप्शन घेऊन तुम्हाला प्रिस्क्रिप्शन मधील औषधे मेडिकल दुकानातून कलेक्ट करून क्लाइंटपर्यंत पोहोचवायची आहेत.

खरंतर अलीकडे सर्वच गोष्टी ऑनलाइन उपलब्ध होत आहेत. मेडिकलमधील औषधे देखील आता ऑनलाईन मागवली जात आहेत. दरम्यान तुम्ही याच गोष्टीचा फायदा घेऊन स्वतःची वैद्यकीय कुरिअर सर्व्हिस सुरू करू शकता. सुरुवातीला तुम्ही एकट्यानेच काम करू शकता.

यासाठी तुम्ही क्लाइंटकडून डॉक्टरांची प्रिस्क्रीप्शन व्हाट्सअप किंवा ईमेलद्वारे मागवू शकता आणि त्यांना औषधे मेडिकलवरून कलेक्ट करून घरपोच पुरवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जाहिरात मात्र करावी लागणार आहे.

या व्यवसायातून कमाईचा विचार केला असता तुम्ही या सेवेसाठी ग्राहकांकडून पैसे घेऊ शकता. शिवाय तुम्ही मेडिकलवरून रोजच औषधे घेणार म्हणून तुम्हाला मेडिकलवरूनही काही कमिशन मिळू शकणार आहे. याचाच अर्थ ग्राहक आणि मेडिकल स्टोअर या दोघांकडून तुम्हाला उत्पन्न मिळू शकते.

Leave a Comment