Snake Average Age : साप पाहिला की भल्याभल्यांना घाम फुटतो. काही साप विषारी आणि काही निमविषारी असतात. सर्पदंशामुळे दरवर्षी भारतात हजारो लोकांना प्राण गमवावे लागतात.
यामुळे साप पाहिला की प्रत्येकालाचं भीती वाटते. मात्र, साप पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अतिशय आवश्यक जीव आहे. त्यामुळे सापाला मारू नये. याउलट सापांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.
हेच कारण आहे की सापाला मारणे आपल्या देशात गुन्हा समजला जातो. एवढेच नाही तर लुप्त होत चाललेल्या सापांची तस्करी करणे देखील आपल्याकडे गुन्हा आहे.
दरम्यान भल्या भल्यांना घाम फोडणारां साप नेमका किती वर्षे जगतो, हे तुम्हाला माहित आहे का? कदाचित तुम्हाला साप किती वर्ष जगतो हे माहिती नसेल.
माणूस 100 वर्ष जगतो हे सर्वांनाच माहिती आहे पण साप किती वर्ष जगतो याबाबत अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. यामुळे आज आपण साप किती वर्ष जगतो याबाबत तज्ञ लोकांनी दिलेली माहिती थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार साप हे 10 ते 25 वर्ष पर्यंत जगू शकतात. वेगवेगळ्या जातीच्या सापांचे वेगवेगळे सरासरी आयुर्मान असते.
म्हणजेच काही साप दहा वर्ष जगतात तर काही साप त्याहीपेक्षा जास्त वर्ष जगत असतात. साप किती दिवस जगणार हे त्यांच्या प्रजातींवर अवलंबून असते. जे छोटे साप असतात ते सरासरी 10 ते 25 वर्षे पर्यंत जगू शकतात.
दुसरीकडे अजगर सारखे मोठे साप 25 ते 40 वर्षांपर्यंत जगतात. गॅरी नावाचा एक साप तर तब्बल 42 वर्षे जगला असल्याची नोंद करण्यात आली आहे.
या सापाला एका महिलेने पाळलेले होते. गॅरी सापाच्या नावावर जगात सर्वात जास्त वर्ष जगण्याचा रेकॉर्ड देखील आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार आपल्याकडे आढळणारा कोब्रा साप हा सरासरी 30 वर्षे जगतो. एकंदरीतच काय की साप हे प्रजातीनुसार दहा वर्षांपासून ते चाळीस वर्षांपर्यंत जगू शकता.