Snake Egg Eat : तुम्ही संडे हो या मंडे रोज खाओ अंडे ! ही जनजागृतीची ऍड नक्कीच पाहिली असेल. किंबहुना तुमच्यापैकी अनेकांना कोंबडीची अंडे खायला आवडत असतील. अनेकजण कोंबडीचे अंडे मोठ्या चवीने खातात. बॉईल करून किंवा मग ऑम्लेट करून अंडी खाल्ली जातात. अनेक खाद्यपदार्थांमध्ये अंड्याचा वापर केला जातो.
डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला देतात. अंड्यामध्ये असणारे पोषक घटक मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. यामुळे लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच अंडी खाल्ली पाहिजेत असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अनेक जण तर दररोज अंड्यांचे सेवन करतात.
अंड्यामध्ये असणारे प्रोटीन व इतर पोषक घटक मानवी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात. पण जशी कोंबडी अंडी देते तसेच साप देखील अंडे देतात मग सापाची अंडी खाल्ली जाऊ शकतात का? असा प्रश्न सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोरा वर विचारला जात आहे.
कोरा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी सापाची अंडी खाल्ली जाऊ शकतात का आणि या अंड्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो याबाबत विचारणा केली आहे. दरम्यान या प्रश्नाला अनेकांनी उत्तर देखील दिले आहे.
खरे तर साप हा एक विषारी प्राणी आहे. हा सरपटणारा प्राणी दिसला तरी अनेकांची पायाखालची जमीन सरकते. आपण सर्वजण सापाला घाबरतो. भारतात सापाच्या अनेक प्रजाती आढळतात. मात्र या सर्वच प्रजाती विषारी नाहीयेत.
काही अगदीच बोटावर मोजण्याइतक्या प्रजाती विषारी आढळतात. पण साप विषारी असो किंवा बिनविषारी सापाला पाहताच आपल्याला घाम फुटतो. पण याच सापाची अंडी खाल्ली तर शरीरावर काय परिणाम होतो सापाची अंडी खाल्ली जाऊ शकतात का, सापाचे अंडे देखील विषारी असते का ? असे काही प्रश्न सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहेत.
विशेष म्हणजे या प्रश्नांना काही लोकांनी उत्तर देखील दिले आहे. एका युजरने कोरा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सापाची अंडी खाल्ली जाऊ शकतात का आणि याचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो असा प्रश्न विचारला होता.
यावर एका युजरने सापाची अंडी खाल्ली जाऊ शकतात मात्र याला चांगले शिजवून खाल्ले पाहिजे असे म्हटले आहे. तसेच एका युजरने सापाची अंडी जर फर्टिलाइज झालेली नसतील तर खाल्ली जाऊ शकतात असे म्हटले आहे. तसेच अनेक देशांमध्ये सापाची अंडी खाल्ली जात असल्याचेही काही युजरचे म्हणणे होते.
सापांच्या अंड्यात आढळतात हे पोषक घटक
तसेच, वाइल्डलाइफ इन्फॉर्मर वेबसाइटने सुद्धा याबाबत माहिती दिलेली आहे. या वेबसाईटवरील माहितीनुसार सापांची अंडी ही खाल्ली जाऊ शकतात. मात्र त्यांना योग्य पद्धतीनं शिजवण्याजी गरज आहे. कोंबडीच्या अंड्यांप्रमाणे सापांच्या अंड्यांमध्येही प्रोटीन असतं आणि ते पौष्टिक असतात. सापांची अंडी विषारी नसतात.
पण जर सापांची अंडी व्यवस्थित शिजवून नाही खाल्ली तर पोट दुखू शकतं. तसेच या वेबसाईट मध्ये जगातील काही देशांमध्ये सापाची अंडी खाल्ली जात असल्याचे म्हटले आहे. वियतनाम, थायलंड, चीन, जपान या देशांमध्ये सापांचं अडं खाल्लं जातं असल्याचा दावा या वेबसाईट मध्ये करण्यात आला आहे.