महाराष्ट्रात तयार होणार आणखी एक समृद्धी महामार्ग ! 4 तासांचा प्रवास आता फक्त 2 तासात, कोणत्या गावांमधून जाणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Samruddhi Mahamarg : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात रस्ते वाहतूक सुधारण्यावर शासन आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक महामार्गाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यातील काही महामार्गांचे कामे सध्या स्थितीला सुरू आहेत तर काही महामार्गांसाठी भूसंपादनाचे काम केले जात आहे.

विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत काही महामार्गांची कामे सुरू होणार आहेत. सध्या राज्यात समृद्धी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असलेला 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग सध्या स्थितीला अंशतः सुरू आहे.

701 किलोमीटर लांबी पैकी 625 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम आधीच पूर्ण झाले असून यावरून वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणजे राहिलेले 76 किलोमीटर लांबीचे काम देखील जुलै 2024 पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.

समृद्धी महामार्गाचा आता फक्त इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा बाकी राहिलेला आहे. एकंदरीत समृद्धी महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अशातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

ती म्हणजे समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार आहे. महाराष्ट्रात आणखी एक नवीन समृद्धी महामार्ग विकसित केला जाणार आहे. नागपूर ते गोंदिया दरम्यान समृद्धी महामार्गाचा विस्तारित टप्पा विकसित केला जाणार आहे. नागपूर-गोंदिया समृद्धी महामार्ग नागपूर, गोंदिया आणि भंडारा या तीन जिल्ह्यांमधून जाणार आहे.

नागपूर ते गोंदिया द्रुतगती महामार्ग हा राज्य शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पासाठी गेल्या महिन्यात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यानुसार हा महामार्ग विदर्भातील नागपूर भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यातील 101 गावांमधून जाणार आहे.

सध्या स्थितीला नागपूर ते गोंदिया हा प्रवास करण्यासाठी चार तासांचा वेळ खर्च करावा लागत आहे मात्र जेव्हा हा महामार्ग तयार होईल तेव्हा प्रवासाचा कालावधी दोन तासांवर येणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे. हा नवीन प्रस्तावित महामार्ग रेडी झाल्यानंतर यावर 160 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहने धावू शकणार आहेत.

या महामार्गाच्या रोडमॅप बाबत बोलायचं झालं तर हा मार्ग नागपूर जिल्ह्यातील नागपूर, उमरेड, कुही, मौदा, भंडारा जिल्ह्यातील भंडारा, मोहाडी आणि गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा व गोंदिया या तालुक्यातून जाणार आहे. हा महामार्ग गोंदिया जिल्ह्यातील 33 गावांमधून जाणार आहे.

गोंदिया जिल्ह्याच्या कोणत्या गावांमधून जाणार हा मार्ग?

हा मार्ग गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा आणि गोंदिया या दोन तालुक्यांमधून जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा मार्ग तिरोडा तालुक्यातील मनोरा, केसलवाडा, येडमाकोट, पांजरा, सरांडी, उमरी, धादरी, बेलाटी, कवलेवाडा, चिरेखनी, भुराटोला, पालडोंगरी, करटी बु., बेरडीपार, डब्बेटोला, सोनेगाव, नहस्टोला या गावांमधून प्रस्तावित करण्यात आला आहे.

तसेच गोंदिया तालुक्यातील बोदा, दवनीवाडा, पिपरटोला, देऊटोला, सोनपुरी, निलागोंदी, रतनारा, लोहारा, पांढराबोडी, लईटोला, लोधीटोला, नवाटोला, घिवारी, लोधीटोला, हलबीटोला व सावरी या गावातून हा मार्ग जाणार आहे.

Leave a Comment