SBI बँक की HDFC कोणती बँक FD वर देते सर्वाधिक व्याजदर ? पहा संपूर्ण डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Vs HDFC Senior Citizens FD Scheme : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठ्या बँकेचे अर्थातच एचडीएफसी बँकेचे आणि देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचे अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या FD रेटची तुलना करणार आहोत.

खरंतर, या दोन्ही बँकांनी सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी विशेष एफडी योजना सुरू केलेल्या आहेत. सीनियर सिटीजन ग्राहकांना एफडी मधून चांगले रिटर्न मिळावेत आणि त्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे यासाठी या बँका तत्पर असून याच पार्श्वभूमीवर या बँकांनी सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी विशेष एफडी योजना सुरू केलेल्या आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की एसबीआय बँकेने वी केअर (Wecare) आणि एचडीएफसी बँकेने सीनियर सिटीजन केअर एफडी नावाच्या विशेष एफडी योजना सुरू केलेल्या आहेत. आज आपण याच दोन्ही एफडी योजनांची तुलना करणार आहोत.

या दोन्ही योजनांमध्ये सर्वाधिक परतावा कोणत्या योजनेतून मिळत आहे याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

HDFC ची सीनियर सिटीजन केअर एफडी

HDFC बँक सिनियर सिटीझन ग्राहकांसाठी विशेष FD योजना चालवत आहे. या एफडी योजनेला बँकेने सीनियर सिटीजन केअर FD असे नाव दिले आहे. एचडीएफसी बँकेच्या या एफडी योजनेला आता जवळपास चार वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे.

या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एचडीएफसी बँक 0.50 % ऐवजी 0.75% अतिरिक्त व्याज देत आहे. खरे तर ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या इतर एफटी योजनेत गुंतवणूक केल्यावर 0.50% अधिकचे रिटर्न दिले जातात.

मात्र या विशेष एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना 0.75 टक्के अधिक चे रिटर्न मिळतात. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून 7.75 टक्के एवढे विक्रमी व्याज दिले जात आहे. या अंतर्गत 5 वर्ष ते 10 वर्ष कालावधीपर्यंत गुंतवणूक करता येते.

हे व्याजदर ५ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी केल्यास लागू होते. दरम्यान या सीनियर सिटीझन केअर एफडी मधील गुंतवणुकीची अंतिम तारीख 11 मे 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच 11 मे पर्यंत या एफडी योजनेत गुंतवणूक करता येणार आहे.

एसबीआय बँकेची वी केअर एफडी योजना

SBI WeCare ही स्पेशल FD योजना कोरोना काळापासून सुरू करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अधिकचा परतावा दिला आहे. या FD योजनेत किमान गुंतवणूक करून, तुम्ही 5 वर्षे आणि 10 वर्षांत जास्त परतावा मिळवू शकता.

SBI WeCare FD वर 50bps चे अतिरिक्त व्याज म्हणजेच 0.50 टक्के अधिकचे व्याज दिले जात आहे. सध्या एसबीआयच्या या एफडी योजनेवर ७.५० टक्के दराने व्याज दिले जात आहे. मात्र या एफडी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी एसबीआय ने 30 सप्टेंबर 2024 ही अंतिम मुदत दिली आहे.

Leave a Comment