Snake Viral : साप हा एक सरपटणारा विषारी प्राणी आहे. विषारी सापाच्या चाव्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. पण साप फक्त विषारीच असतात असे नाही तर बिनविषारी साप देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणात आढळतात. विषारी सापांच्या तुलनेत आपल्या देशात बिनविषारी सापांच्या प्रजाती अधिक आढळल्या आहेत. देशात काही मोजक्याच विषारी सापांच्या प्रजाती आढळतात.
यात किंग कोब्रा, मन्यार, घोणस इत्यादी प्रजातींचा समावेश होतो. दरम्यान उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा पावसाळ्यात साप अन्नाच्या शोधात अथवा पाण्याच्या आणि वाढत्या तापमानातून दिलासा मिळावा यासाठी मानवी वस्तीमध्ये शिरत असतो.
उन्हाळ्यात थंडाव्याच्या शोधात आणि अन्नाच्या शोधात साप हा घरांमध्ये देखील शिरतो. घराच्या अवतीभोवती जर त्याला लपण्यासाठी अडगळीची जागा असेल तर अशा ठिकाणी साप निघण्याची शक्यता अधिक असते. सापाचे अन्न, बेडूक, उंदीर मासे आहे.
त्यामुळे तो या अन्नाच्या शोधात उन्हाळ्यात इकडे तिकडे भटकत असतो. दुसरीकडे पावसाळ्यात बिळात पाणी शिरते यामुळे तो आश्रय घेण्यासाठी बिळाबाहेर पडत असतो. अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून साप घरात घुसू नये किंवा घराच्या आजूबाजूला सुद्धा साप पाहायला मिळू नये यासाठी काय केले पाहिजे असा प्रश्न उपस्थित केला होता.
याबाबत जाणकार लोकांना विचारले असता त्यांनी अशी काही झाडे आहेत ज्यांची घराजवळ लागवड केली तर साप घरात किंवा घराच्या आजूबाजूला सुद्धा नजरेस पडणार नाहीत असे म्हटले आहे. दरम्यान आता आपण याच 5 झाडांची माहिती जाणून घेणार आहोत.
1)सर्पगंधा : ही एक वनस्पती आहे ज्याचा वास खूप तिखट अन उग्र असतो. या कारणास्तव सापांना ही वनस्पती आवडत नाही. खरेतर सापांना उग्र वास सहन होत नाही. तुम्ही ते तुमच्या घरातील बागेत किंवा गच्चीतल्या, ओट्यावरल्या कुंडीत लावू शकता.
2) लेमन ग्रास : लेमन ग्रास किंवा गवती चहा ही देखील अशी एक वनस्पती आहे, जिची लागवड घराशेजारी केली तर साप दूर पळतो. याचे कारण म्हणजे ही वनस्पती जे तेल सोडते त्याचा वास खूप तेज असतो.
3) सापांना दूर ठेवण्यासाठी घराबाहेर गरूडाचे झाड लावू शकता. घरामध्ये गरूड फळ ठेवल्यास विषारी प्राणी त्यापासून लांब पळतात. हे फळ अगदी सापाएवढे लांब असते. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत जे सापाचे विष काढून टाकण्यासाठी प्रभावी मानले जातात.
4) स्नेक प्लांट : हे देखील प्लांट सापांना दूर पळवते. याची लागवड तुम्ही तुमच्या ओट्यावरील कुंडीत किंवा इनडोरमध्ये देखील याची लागवड केली जाऊ शकते.
5)कॅक्टस : काटेरी झुडुप म्हणून ओळखले जाणारे कॅक्टस घराशेजारी लावले तर साप दूर पळतात. सरपटणारे साप या काटेरी झुडपापासून नेहमीच लांब राहतात. त्यामुळे सापाला दूर ठेवण्यासाठी तुम्हीही तुमच्या घराशेजारी याची लागवड करू शकता.