Snake Viral News : भारतात सापांबाबत अनेक भ्रामक कथा पाहायला मिळतात. खरेतर साप हा एक विषारी प्राणी आहे. सापाच्या सर्वच जाती विषारी आहेत अशा नाही मात्र सापाच्या काही जाती खूपच विषारी आहेत. दरवर्षी सर्पदंश झाल्याने हजारो नागरिकांचे जीव जातात. यामुळे सापांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो. सापांना आपण सर्वजण खूपच घाबरत असतो.
मात्र अनेकदा भीतीपोटी सापांना मारून टाकले जाते. साप आपल्यावर हल्ला चढवेल, दंश करील या भीतीने काहीजण त्यांना मारतात. मात्र साप हे पर्यावरणासाठी खूपच गरजेचे आहेत. यामुळे त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे.
दरम्यान सर्पदंश झाल्याच्या अनेक घटनांमध्ये असे आढळून आले आहे की सापाला मारण्याचा प्रयत्नातच अधिकाधिक सर्पदंश झाले आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही कधी साप दिसला तर त्यापासून दूर राहणे आवश्यक आहे.
तसेच तुमच्या घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात साप आढळला तर सर्वप्रथम सर्पमित्रांना फोन लावा आणि त्या सापाला जंगलात सोडून द्या. दरम्यान सोशल मीडियामध्ये सापांबाबत वेगवेगळे दावे केले जातात. सध्या असाच एक दावा व्हायरल होत आहे.
यामध्ये असे म्हटले गेले आहे की साप जर मागे लागला तर सरळ कधी धावू नये, तर नागमोडी वळणाने धावावे. मात्र हे कितपत खरे आहे आणि साप खरंच माणसाचा पाठलाग करतो का? याच संदर्भात आज आपण तज्ञ लोकांनी दिलेली माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तज्ञ सांगतात की जोपर्यंत तुम्ही सापाला त्रास देत नाही तोपर्यंत तो तुम्हाला दंश करत नाही. साप नेहमीच पळून जाण्याच्या भूमिकेत असतो. जर एखाद्या मनुष्याचा सापासोबत सामना झाला तरी देखील तो पळून जाण्याच्या भूमिकेत असतो.
यामुळे साप मनुष्याचा पाठलाग करतो हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट होते. साप कधीच मनुष्याचा पाठलाग करत नाही. मात्र, सापाला डीवचण्याचा प्रयत्न केला तर तो चावतो. जर तुम्ही सापाला डिवचण्याचा प्रयत्न केला, तुम्ही पळण्याचा प्रयत्न केला तर तो तुमच्यावर हल्ला चढवू शकतो.
यामुळे साप दिसला तर त्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा. त्याला त्रास देऊ नका मग तो आपोआप निघून जाईल. विशेष म्हणजे किंग कोब्रा सहित अशा अनेक प्रजातीचे साप आहेत ज्यांना स्पष्ट दिसत नाही. एकंदरीत साप माणसाचा पाठलाग करतो हा जो दावा सोशल मीडियामध्ये केला जात आहे तो पूर्णपणे खोटा आहे.
परंतु साप पाठलाग करत नाही याचा अर्थ तुम्ही त्याला त्रास दिला तर तो काहीच करणार नाही, असा होत नाही. जर तुम्ही त्याला त्रास दिला तर तो तुमच्यावर हल्ला करणारच आहे. त्यामुळे नेहमीच सापांपासून लांब राहा.