Snake Viral News : आपल्या देशात सापाबाबत मोठे गैरसमज आहेत. देशात आढळणारे बहुतांशी साप बिनविषारी आहेत. मात्र देशात काही प्रजातीचे साप हे विषारी आहेत. निमविषारी आणि विषारी सापांची संख्या आपल्या देशात बऱ्यापैकी आहे.
विषारी सापांमध्ये किंग कोब्रा अर्थातच नाग या प्रजातीचा समावेश होतो. नाग हा सर्प आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात आढळतो. मात्र या नागाबाबत अनेक रंजक गोष्टी सांगितल्या जातात. दंतकथांमध्ये नागांचा मोठ्या प्रमाणात उल्लेख पाहायला मिळतो.
नागांशी संबंधित असलेल्या दंतकथांमध्ये नागमणीचा उल्लेख आढळतो. चित्रपटांमध्ये देखील नागांकडे नागमणी असतो असे दाखवले जाते. त्यामुळे साहजिकच सर्वसामान्यांना नागांकडे खरंच नागमणी असतो का? असा प्रश्न पडलेला आहे.
नागमणी असण्याबाबत वैज्ञानिकांचे काय मत आहे, ते दंत कथांमध्ये दाखवलेल्या आणि चित्रपटांमध्ये दाखवत असलेल्या नागमणी संदर्भात काय मत व्यक्त करतात याबाबत अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
दरम्यान आज आपण याच संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर भारतीय दंतकथांमध्ये आणि चित्रपटांमध्ये नागांकडे एक नागमणी असतो आणि याचा वापर करून आपल्या मनातील इच्छा पूर्ण केली जाऊ शकते असे दाखवले जाते.
पण या नागमणी बाबत वैज्ञानिक प्रमाण आहे की नाही ? ही फक्त एक कल्पना आहे की यामागे काही तथ्य आहे. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की वैज्ञानिकांनी नागमणी असण्याबाबतच्या दंतकथा आणि चित्रपटांमध्ये असणाऱ्या कहाण्या या कल्पनेचा एक भाग असल्याचे म्हटले आहे.
वैज्ञानिक नागमणीला मानत नाहीत. वैज्ञानिकांचे असं म्हणणं आहे की ही एक फक्त कल्पना आहे. नागाच्या डोक्यांवर चमकणारी नागमणी सारखी कोणतीच वस्तू नसते. ही फक्त एक कल्पना आहे. दंतकथा रोचक बनवण्यासाठी याचा वापर करण्यात आला आहे.
मात्र पौराणिक कथांमध्ये नागमणीचा उल्लेख आढळतो. या कथांमध्ये इच्छाधारी नाग आणि नागिनीचा देखील उल्लेख आढळतो. मात्र वैज्ञानिक इच्छाधारी नाग आणि नागिन देखील कल्पनेचा भाग असल्याचे सांगतात.असे सांगितले जाते की इच्छाधारी नाग रूप बदलू शकतो आणि मानवाचे रूप धारण करू शकतो.
मात्र वैज्ञानिक इच्छाधारी नाग आणि नागमणी या सर्व भ्रामक गोष्टी असल्याचे सांगतात. एकंदरीतच काय की दंतकथांमध्ये सांगितलेल्या या सर्व गोष्टींना वैज्ञानिक प्रमाण नाहीये. यामुळे या गोष्टी खरंच असतात की नाही याबाबत ठोस प्रमाण कुठेच आढळत नाही.