गुड न्यूज ! तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर, आता निवड यादी केव्हा निघणार ? समोर आली नवीन तारीख, वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Talathi Bharati 2023 : तलाठी भरतीची परीक्षा दिलेल्या लाखो उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरंतर गेल्या काही वर्षांच्या प्रतीक्षानंतर तलाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे या भरतीला लाखो नवयुवक तरुणांनी प्रतिसाद दिला आहे.

4466 रिक्त जागेवरील तलाठी भरतीसाठी जवळपास साडे दहा लाखाच्या आसपास तरुणांनी अर्ज सादर केले होते. विशेष म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील साडे आठ लाखाच्या वर होती. विद्यार्थी संख्या लाखोंच्या घरात असल्याने तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यासाठी बराच वेळ लागत होता.

यामुळे तलाठी भरतीची गुणवत्ता यादी केव्हा जाहीर होणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. गुणवत्ता यादी बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर प्रसिद्ध झाली आहे.

यामुळे आता तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी केव्हा जाहीर होणार हाच प्रश्न अर्जदारांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. दरम्यान याच बाबत अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 13 जिल्ह्यातील आदिवासीबहुल अर्थातच पेसा क्षेत्रातील रिक्त जागा संदर्भात कोर्टात प्रकरण सुरू आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेलेले आहे.

त्यामुळे याच्या निकालाला विलंब देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत या संबंधित 13 जिल्ह्यातील अंतिम यादी उशिराने जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे 13 जिल्हे वगळता उर्वरित 23 जिल्ह्यांमधील उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार आहे.

आगामी तीन आठवड्यात यशस्वी उमेदवारांची यादी भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर केली जाणार आहे. तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक सरिता नरके जी यांनी ही माहिती दिली आहे.

एकंदरीत येत्या सोमवारपासून तलाठी भरतीची निवड यादी जाहीर होणार आहे. आता या निवड यादीत कोणाचा नंबर लागतो, कोण तलाठी होतो याकडे आता अर्जदारांचे विशेष बारीक लक्ष राहणार आहे.

विशेष म्हणजे, निवड यादी जाहीर होण्यास आता अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असल्याने उत्सुकता सोबतच अर्जदारांच्या मनात मोठी धाकधूक देखील आहे.

Leave a Comment