Snake Viral News : साप हा असा एक विषारी प्राणी आहे ज्याला पाहताच क्षणी पायाखालची जमीन सरकते. भीतीमुळे अंग थरथरत. आपल्यापैकी क्वचितच असा एखादा व्यक्ती असेल ज्याला सापाची भीती वाटतं नसेल. सर्पमित्र सोडून जवळपास आपण सारेजण सापाला भयंकर घाबरतो. मात्र अनेकदा काही लोक भीती पोटी सापाला मारून टाकतात. काही प्रसंगी तर सापाला मारण्याचा प्रयत्नात लोकांना सर्पदंश झाला आहे.
यामुळे जर तुम्हाला कधी साप दिसला तर त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका, साप विषारी असो किंवा बिनविषारी त्याच्यापासून एक ठराविक अंतर ठेवा. सापाला मारणे हे पर्यावरणासाठी चांगली गोष्ट नाही. सर्प विषारी असला तरीदेखील त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. दरम्यान, आज आपण जर साप घरात घुसला तर काय केले पाहिजे ? कोणत्या औषधी वनस्पतीची फवारणी केल्यानंतर साप घराबाहेर निघून जातो? याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या औषधी वनस्पतीच्या फवारणीने साप लांब पळतो
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुमच्या घरात साप शिरला असेल तर लगेचच तुमच्या घरात असलेल्या फिनाईलची फवारणी सुरू करा. बाहेर जाण्यासाठी फक्त एक किंवा दोन खिडक्या किंवा दरवाजे उघडे ठेवा, जेणेकरून फिनाइलच्या वासाने साप बाहेर जाऊ शकेल.
जर तुमच्या घरात रॉकेल असेल तर ते देखील फवारणे जाऊ शकते. पण फिनाईल किंवा रॉकेल सापावर फवारू नका तर तो जिथे लपून बसलेला असेल त्या जागेच्या आजूबाजूला याची फवारणी करा. फिनाईल किंवा रॉकेल सापावर थेट फवारले तर यामुळे सापाला इजा होऊ शकते.
याशिवाय, नैसर्गिक उपाय म्हणून तुम्ही लवंग आणि दालचिनीचे तेल फवारू शकता. हे दोन्ही तेल समान प्रमाणात घेऊन चांगले मिक्स करून सापावर दुरूनच फवारले तर साप जिथे लपलेला असेल तेथून दूर पळून जाईल असा दावा तज्ञांनी केलेला आहे.
तथापि जर तुमच्या घरात साप घुसला असेल तर तुम्ही लवकरात लवकर सर्प मित्राला बोलवून तो साप पकडून दूरवरच्या जंगलात सोडून दिला पाहिजे. जर सर्पमित्र येण्यास उशीर होत असेल तर तुम्ही वर सांगितलेले उपाय करू शकता. मात्र शक्यतो सर्पमित्राला बोलवून साप पकडून त्याला दूर जंगलात सोडण्याचा प्रयत्न करा.
या झाडांची घराजवळ लागवड केल्यास साप घरात येणार नाही
सर्पगंधा : ही अशी एक औषधी वनस्पती आहे जी की सापाला अजिबात आवडत नाही. साप याच्याजवळ सुद्धा येत नाही. या वनस्पतीचा वास खूप तिखट असतो. यामुळे जर तुमच्या घरात सातत्याने साप निघत असतील तर तुम्ही सर्पगंधा वनस्पती तुमच्या घराच्या बागेत किंवा कुंडीत लावू शकता.
गरुड वृक्ष : सापांना गरुड वृक्षाचा वाघ देखील सहन होत नाही. या झाडापासून साप नेहमीच दूर राहतात. यामुळे जर तुम्ही तुमच्या घराबाहेर या झाडाची लागवड केली तर साप तुमच्या घराजवळही फरकटणार नाही. गरूड वृक्षाचे फळ घरात ठेवल्यास विषारी प्राणी दूर पळतात.
हे फळ लांब असून सापासारखे दिसते. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे सापाचे विष देखील काढून टाकतात. मुळात हे झाड जंगलात आढळते. पण तुमच्या घराजवळ याची लागवड केली तर साप तुमच्या घराशेजारी येणार नाहीत.
याशिवाय, तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीत, अंगणात, टेरेसवर स्नेक प्लांट, झेंडूचे फूल, लेमनग्रास, तुळस, निवडुंग यांसारखी झाडे लावली पाहिजेत. या झाडांच्या वासांमुळे साफ नेहमीच तुमच्या घरापासून दूर राहतील.