Solar Panel Subsidy : केंद्र सरकार तसेच राज्य सरकार वेगवेगळ्या घटकांसाठी विविध योजना सुरू करत असतात. पीएम मोदी यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी पीएम सूर्योदय योजना या नवीन योजनेची घोषणा केली होती. 22 जानेवारी 2024 अर्थातच श्रीक्षेत्र अयोध्या येथील भव्य राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी त्यांनी या योजनेची घोषणा केली.
पुढे मात्र या योजनेचे नाव पीएम सूर्यघर मोफत वीज योजना असे झाले. या योजनेअंतर्गत देशभरातील एक कोटी कुटुंबांना महिन्याकाठी 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवण्याचे लक्ष सरकारने ठेवले आहे. या अंतर्गत सर्वसामान्यांना सोलर पॅनल बसवण्याकरिता अनुदान दिले जाणार आहे.
विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र या योजनेबाबत आणि सोलर पॅनल संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहेत.
जसं की या योजनेअंतर्गत किती किलो वॅटच्या सोलर पॅनलला किती अनुदान मिळते आणि किती किलोमीटरचे सोलर पॅनल किती युनिट वीज तयार करू शकते ? असे काही प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत.
दरम्यान आज आपण याच संदर्भात माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण पीएम सूर्य घर मोफत योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते याविषयी जाणून घेऊया.
किती अनुदान मिळणार
या योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे. हे अनुदान सोलर पॅनलच्या क्षमतेनुसार राहणार आहे.
या अंतर्गत एक किलोवॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी तीस हजार, दोन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 60000 आणि तीन किलो वॅट तसेच तीन किलोमीटर पेक्षा जास्त परंतु दहा किलो वॅट पर्यंतची क्षमता असलेले सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजाराचे अनुदान दिले जाणार आहे.
सोलर पॅनल किती वीज तयार करते
पीएम सूर्यघर मोफत वीज योजना ही केंद्राची एक योजना असून याचे पोर्टल सुरू झालेले आहे. या पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या कुटुंबाला महिन्याकाठी 300 युनिट वीज म्हणजेच दररोज दहा युनिट वीज लागत असेल तर अशा कुटुंबाने तीन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवले पाहिजे.
म्हणजेच तीन किलो वॅटचे सोलर पॅनल 300 युनिट पर्यंतची वीज तयार करू शकते. त्यामुळे जर तुम्हाला तीनशे युनिट पर्यंतची वीज लागत असेल तर तुम्ही तीन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवू शकता.
जर तुम्हाला यापेक्षा अधिक वीज लागत असेल तर तुम्हाला अधिक क्षमता असणारे सोलर पॅनल बसवावे लागणार आहे. तसेच कमी वीज लागत असेल तर यापेक्षा कमी क्षमता असणारे पॅनल बसवले पाहिजें.