Sonalika Tractor News : भारतीय शेतीमध्ये गेल्या काही दशकात मोठा बदल झाला आहे. शेतीमध्ये आता यांत्रिकीकरणाला चालना दिली जात आहे. यंत्रांच्या साह्याने शेतीची कामे अधिक जलद आणि कमी खर्चात होत असल्याने शेतीमध्ये यंत्राचा वापर वाढला आहे. मजूर टंचाई वाढली असल्याने आता शेतीकामांसाठी ट्रॅक्टरचा वापर अधिक होऊ लागला आहे.
अगदी पूर्वमशागतीपासून ते काढणीच्या कामापर्यंत आणि काढणीनंतर शेतमाल बाजारात नेण्यापर्यंत सर्वत्र ट्रॅक्टरचा वापर होत आहे. अगदी फवारणीसाठी देखील ट्रॅक्टरचा वापर होतोय. ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतीकामे जलद गतीने पूर्ण होत आहेत. दरम्यान जर तुम्हीही ट्रॅक्टरची खरेदी करू इच्छित असाल तर आज आम्ही आपल्यासाठी सोनालिका कंपनीच्या एका विशेष ट्रॅक्टर बाबत माहिती घेऊन हजर चालू आहोत.
आज आपण सोनालिका कंपनीच्या पाच लाख रुपये किंमत असलेल्या आणि शेती कामासाठी अधिक उपयुक्त अशा एका ट्रॅक्टरची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण सोनालिका एम एम प्लस 39 DI या ट्रॅक्टरबाबत जाणून घेऊया. खरंतर सोनालिका कंपनी देशातील एक प्रमुख ट्रॅक्टर निर्माता कंपनी आहे.
या कंपनीवर लोकांचा मोठा गाढा विश्वास आहे. सोनालीका ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय झाले आहे कारण की या ट्रॅक्टरच्या किमती या इतर ब्रँडच्या ट्रॅक्टर पेक्षा खूपच कमी असतात. यामुळे शेतकऱ्यांसाठी बजेट फ्रेंडली असलेल्या या कंपनीचे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात विक्री होतात.
सोनालिका MM+ 39 DI ट्रॅक्टर बाबत थोडक्यात
सोनालिका MM+ 39 DI हा कंपनीचा एक हाय सेलिंग ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनला आहे. या ट्रॅक्टरला 3 सिलिंडर आणि 2780 सीसी पॉवरफुल इंजिन देण्यात आले आहे. हा 39 HP चा ट्रॅक्टर आहे. याशिवाय या ट्रॅक्टरमध्ये 1800 RPM रेट केलेले इंजिन देण्यात आले आहे.
यासोबतच या ट्रॅक्टरमध्ये कूलिंगसाठी वॉटर कुल्ड आणि एअर फिल्टरसाठी वेट टाईप देण्यात आले आहे. यामुळे हा ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी अधिक उपयुक्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या ट्रॅक्टर मध्ये आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गेअर आहेत. या ट्रॅक्टरला ऑइल ब्रेक देण्यात आले आहेत. मॅन्युअल आणि पावर स्टेरिंग दोन्ही ऑप्शन सोबत हे ट्रॅक्टर उपलब्ध आहे. या ट्रॅक्टरचा कमाल स्पीड हा 34 किलोमीटर प्रतितास एवढा आहे.
ट्रॅक्टर मध्ये 55 लिटरची डिझेल टॅंक आहे. हे 1800 kg पर्यंत वजन उचलण्यास सक्षम आहे. या ट्रॅक्टरची किंमत 5.02 लाख ते 5.28 लाखांपर्यंत आहे. निश्चितच पाच लाखाच्या किमतीत हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी अधिक परवडणारा सिद्ध होणार आहे. ज्या लोकांना पाच लाखाच्या बजेटमध्ये चांगला ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल त्या लोकांसाठी या ट्रॅक्टरचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.