Soyabean Bajarbhav : सोयाबीन हे महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये उत्पादित होणारे मुख्य नगदी पीक आहे. एका आकडेवारीनुसार देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 45% सोयाबीन उत्पादन एकट्या मध्य प्रदेश राज्यात घेतले जाते आणि त्या खालोखाल देशाच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास 40% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जात आहे.
याचाच अर्थ सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. यामुळे देशातील जवळपास निम्म्याहून अधिक शेतकरी या पिकावर अवलंबून असल्याचे पाहायला मिळते. प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ या विभागातील शेतकऱ्यांचा याच पिकावर अधिक मदार असल्याचे चित्र आहे.
परिणामी याला चांगला दर मिळाला तरच राज्यातील शेतकऱ्यांना चांगली कमाई होते. यंदा मात्र हंगामाच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच विजयादशमीपासून सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. सुरुवातीला चांगल्या मालाला सुद्धा हमीभावाच्या आसपासचं दर मिळतं होता.
मध्यंतरी बाजारभावात सुधारणा झाली. चांगल्या मालाचे दर जवळपास सहा हजाराच्या आसपास पोहोचले होते. मात्र आता पुन्हा एकदा बाजारभाव दबावात आले आहेत. बाजारभाव कमी झाले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अशातच बाजार अभ्यासकांनी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची माहिती दिली आहे. बाजार अभ्यासकांनी सोयाबीनचे भाव आणखी किती काळ दबावत राहू शकतात याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.
अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या बाजारात मंदी आली आहे. याचा परिणाम म्हणून सोयाबीनच्या बाजाराने गेल्या दोन महिन्यातील निचांकी पातळी गाठली असल्याची माहिती बाजार अभ्यासकांनी दिली आहे.
काल दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १२.९८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. याशिवाय काल सोयापेंडचे वायदे सुद्धा कमी झालेत. काल सोयाबीन वायदे ३८७ डाॅलर प्रतिटनांवर आले होते. खरे तर आता ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत.
ख्रिसमस अर्थातच नाताळ सण संपूर्ण जगात आजरा होत असतो आणि याचा परिणाम म्हणून सोयाबीनच्या जागतिक बाजारात देखील ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने आणि त्यामुळे बाजारात असलेल्या निराशेच्या वातावरणाचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात सोयाबीन दरात घसरण झाली आहे.
साहजिकच याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर देखील पाहायला मिळत आहे. देशातही आता सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काल अर्थातच 22 डिसेंबर 2023 रोजी सोयाबीनला ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला आहे.
दरम्यान जाणकार लोकांनी ही परिस्थिती पुढील एक किंवा दोन आठवडे अशीच कायम राहू शकते, अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी गरज असेल तरचं मालाची विक्री करावी नाहीतर सोयाबीन विक्री थोडा काळ थांबवली पाहिजे असे आवाहन केले आहे.