Soybean Bajarbhav : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. सोयाबीनला शेतकरी बांधव पिवळं सोनं म्हणून ओळखतात.
पण गेल्या एका वर्षापासून हे पिवळं सोन पूर्णपणे काळवंडलं आहे. कारण की, गेल्या एका वर्षापासून सोयाबीन दर दबावात आहेत. गेल्या हंगामात सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळाला नव्हता. यंदा मान्सून काळात समाधानकारक असा पाऊस बरसला नसल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.
यामुळे यंदा पिवळं सोनं चमकणार अशी भोळी भाबडी आशा राज्यातील शेतकऱ्यांनी उराशी बाळगली होती. जाणकार लोक देखील या वर्षी उत्पादनात घट आली तर कदाचित दर वाढतील असे सांगत होते. मात्र सध्या स्थितीला सर्व समीकरण उलट फिरलं आहे.
उत्पादनात घट असतानाही, बाजारात अजून सोयाबीनची अपेक्षित अशी आवक होत नसतानाही पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळत नाहीये. पण काल सोयाबीन बाजारातून शेतकऱ्यांसाठी दिलासादायी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे यंदा पिवळं सोनं प्रथमच चमकल आहे.
काल सोयाबीनला या चालू हंगामातील विक्रमी दर मिळाला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. खरंतर दिवाळीचा सण मात्र दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नऊ तारखेपासून यावर्षी दिवाळीचा सण सुरू होणार आहे.
अशातच आता सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होऊ लागली आहे. यामुळे सणासुदीच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांना या दरवाढीचा फायदा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी भाव ?
काल अर्थातच 6 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या लिलावात राज्यातील वासिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळं सोनं चमकलं आहे. या मार्केटमध्ये कालच्या लिलावात सोयाबीनला या चालू हंगामातील विक्रमी भाव नमूद करण्यात आला आहे.
वासिम एपीएमसी मध्ये काल सोयाबीनला 5 हजार 451 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव नमूद करण्यात आला होता. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे. खरंतर गेल्या एका वर्षापासून सोयाबीनचे बाजार भाव 4200 ते 4800 या भाव पातळीवरच फिरत होते. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे बिघडले होते.
शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नव्हता. पण आता सणासुदीच्या काळात दरवाढ झाली असल्याने शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. शिवाय आगामी काळात आणखी भाववाढ होईल अशी आशा देखील पल्लवीत होत आहे.
सोयाबीन बाजारभाव आगामी काळात वाढणार का ?
खरंतर केंद्र सरकारने सोयातेल आणि डीओसी आयात करण्याचे धोरण स्वीकारले आहे. याचा परिणाम म्हणून देशांतर्गत मुबलक प्रमाणात सोया तेलाची आणि डीओसीची उपलब्धता झाली आहे. डीओसी अर्थातच ढेप आणि सोयाबीन तेल मोठ्या प्रमाणात आयात होत असल्याने याचा दबाव सोयाबीन दरावर पाहायला मिळत आहे.
मात्र, वासिम एपीएमसी मध्ये बाजारभावात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु आगामी काळात दर असेच तेजीत राहतील किंवा याच्यात वाढ होईल का हे आत्ताच सांगणे थोडे अवघड आहे. कारण की केंद्र सरकारचा सोयाबीन तेल आयात करण्याचा आणि डी ओ सी आयात करण्याचा निर्णय दरवाढीसाठी प्रतिकूल परिस्थिती तयार करत आहे.