ST Bus Pass : तुम्हीही लाल परीने प्रवास केला आहे ना? नक्कीच तुम्ही एसटी महामंडळाच्या बसने प्रवास केलेलाच असेल. असा एखादाच व्यक्ती असेल जो कधी एसटी महामंडळांच्या बसमधून गेलेला नसेल. खरंतर एसटी महामंडळाची बस गावागावांमध्ये सेवा देत आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या प्रवाशांची संख्या उल्लेखनीय आहे.
एसटीच्या बसचे नेटवर्क हे खूपच विस्तारलेले असल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी एसटीच्या प्रवासाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. विशेषतः सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये एसटी प्रवाशांची संख्या आणखी वाढत असते.
सध्या संपूर्ण देशभर उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत आणि लग्नाचा देखील सीजन सुरु आहे. यामुळे एसटीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत.
दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या उन्हाळी सुट्टीत कुठे पर्यटनासाठी बाहेर निघणार असाल, तुमची महाराष्ट्र दर्शनाला जायची इच्छा असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण एसटी महामंडळाच्या एका विशेष योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
एस टी महामंडळाच्या या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही अवघ्या 1170 रुपयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करू शकणार आहात. हो, बरोबर ऐकताय तुम्ही, आता अवघ्या 1170 रुपयात तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करता येणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया एसटी महामंडळाची ही विशेष योजना नेमकी आहे तरी कशी.
कोणती आहे ती योजना ?
आम्ही काय योजनेबाबत बोलत आहोत ती योजना एसटी महामंडळाने 1988 मध्ये सुरू केली होती. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेला आवडेल तेथे कोठेही प्रवास असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना सात दिवसांचा आणि चार दिवसांचा पास काढता येतो.
ठराविक रक्कम भरून काढलेला हा पास वापरून प्रवाशांना संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्र बाहेर एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करता येणे शक्य होते. साध्या आणि शिवशाही बस मध्ये हा पास चालतो. मात्र शिवशाही बसने प्रवास करण्यासाठी पास काढायचा झाल्यास अधिकचा पैसा मोजावा लागतो.
कसे असणार पासचे दर ?
4 दिवसांच्या पासचे दर : साध्या बससाठी प्रौढ व्यक्तींना 1170 रुपये आणि लहान मुलांना 585 रुपये मोजावे लागतील. शिवशाही बस साठी प्रौढ व्यक्तींना पंधराशे वीस रुपये आणि लहान मुलांना 765 रुपये मोजावे लागणार आहेत.
7 दिवसाच्या पासचे दर : साध्या बससाठी प्रौढ व्यक्तींना 2040 रुपये आणि लहान मुलांना 1025 रुपये मोजावे लागणार आहेत. शिवशाही बस साठी प्रौढ व्यक्तींना 3030 आणि लहान मुलांना 1520 रुपये द्यावे लागणार आहेत.