State Bank Of India : भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. विशेष म्हणजे येत्या काही वर्षात देशाची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास आता व्यक्त होत आहे.
अर्थातच भारत जलद गतीने विकसित होण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. दरम्यान, आज आपण जगातील 20 सर्वात मोठ्या बँकांची माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश होतो की नाही हे देखील आज आपण पाहणार आहोत.
तसेच एसबीआय ही जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे याची माहिती आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरेतर भारतात गेल्या काही वर्षांमध्ये अगदी तळागाळातील नागरिक देखील बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. अजूनही काही नागरिक बँकिंग व्यवस्थेशी जोडलेले नाहीत. मात्र सरकारने सर्वसामान्यांना बँकेसोबत जोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
एसबीआय ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. मात्र, जगातील सर्वाधिक मोठ्या बँकांच्या यादित पहिल्या चार मध्ये चीनच्या बँकांचा समावेश होतो.
मिळालेल्या माहितीनुसार चीन येथील आयसीबीसी, चाइना कन्स्ट्रक्शन बँक, एग्रीकल्चरल बँक ऑफ चायना आणि बँक ऑफ चायना या चार बँका जगातील सर्वाधिक मोठ्या बँकांच्या यादीत टॉप चार मध्ये येतात.
पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर अमेरिकेच्या बँका आहेत. बँक ऑफ अमेरिका ही पाचव्या क्रमांकावर येते आणि सहाव्या क्रमांकावर जेपीमॉर्गन चेस ही बँक येते. सातव्या क्रमांकावर जापान येथील मित्सुबिशी ही बँक विराजमान आहे.
HSBC आठव्या स्थानावर आहे, BNP नवव्या स्थानावर आहे आणि क्रेडिट ऍग्रीकोल दहाव्या स्थानावर आहे. यानंतर सिटीग्रुप 11व्या स्थानावर आहे. पोस्टल सेव्हिंग बँक ऑफ चायना 12व्या, वेल्स फार्गो 16व्या, बॅन्को सांचेझ 17व्या आणि यूबीएस ग्रुप 20व्या स्थानावर आहे.
अर्थातच टॉप 20 बँकांच्या यादीत भारताच्या एकाही बँकेचा समावेश नाही. विशेष म्हणजे 2023 मध्ये टॉप 100 बँकांमध्ये भारताच्या केवळ एका बँकेचा समावेश होता.
स्टेट बँक ऑफ इंडिया ही एकमात्र बँक टॉप 100 बँकांमध्ये येते. एसबीआय जगातील सर्वात मोठ्या बँकेच्या यादीत 48 व्या क्रमांकावर विराजमान आहे.