महाराष्ट्राला मिळणार आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट ! मध्य रेल्वेची मंजुरी, कसे राहणार रूट ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील दोन महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे आपल्या राज्यातील सात महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. राज्यातील मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गोवा, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

अशातच आता मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव या मार्गावर दोन वंदे भारत गाड्या सुरू करण्याची योजना असल्याची मोठी माहिती दिली आहे.

एवढेच नाही तर सदर अधिकाऱ्याने या प्रस्तावाला मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून यापूर्वीच मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले आहे. दररोज देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्रीक्षेत्र शेगाव येथे दर्शनासाठी येत असतात.

यामध्ये मुंबई आणि पुण्यातून जाणाऱ्या भाविकांची संख्या सर्वाधिक आहे. हेच कारण आहे की, या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विदर्भाची पंढरी म्हणून श्रीक्षेत्र शेगाव ओळखले जाते.

दरम्यान या विदर्भाच्या पंढरीत दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरीता आणि या मार्गावर दैनंदिन प्रवाशांची होणारी भरीव वर्दळ लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे आणि मुंबई ते शेगाव या दोन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

याचा उद्देश श्रीक्षेत्र शेगाव येथे येणाऱ्या भाविकांचा आणि इतर प्रवाशांचा प्रवास सुव्यवस्थित करण्याचा आहे, ज्यांना अनेकदा प्रवासादरम्यान विविध अडचणींना सामोरे जावे लागते.

याव्यतिरिक्त, रेल्वे मंत्रालयाने मे 2024 पर्यंत विविध तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या 30 ते 35 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची योजना आखली आहे, शेगाव त्यापैकी एक आहे. 

शेगाव येथील गजानन महाराजांच्या श्रीक्षेत्राला भेट देणाऱ्यांना पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि सोयीस्कर प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे.

निश्चितच जर देशाच्या आर्थिक राजधानीतून अर्थातच मुंबईतून आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतून म्हणजेच पुण्यातून शेगावसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तथापि, ही गाडी नेमकी केव्हा सुरू होणार याबाबत अजूनही कोणतीच अधिकृत अपडेट समोर आलेली नाही.

Leave a Comment