आताची सर्वात मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार लाभ, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee DA Hike : नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशभरात नवरात्र उत्सवाचा पावन पर्व साजरा झाला आहे. नवरात्र उत्सव हा हिंदू सनातन धर्मात अतिशय पावन आणि पवित्र सण समजला जातो. या सणात हिंदू कुटुंबात मांसाहार, कांदा, लसूण यांसारख्या पदार्थांचे सेवन देखील केले जात नाही.

या काळात मद्यपान देखील केले जात नाही. एकंदरीत नवरात्र उत्सव हा सनातन धर्मांमध्ये खूप मोठा आणि पवित्र उत्सव आहे. दरम्यान यंदाचा पावन अन पवित्र नवरात्र उत्सव हा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास ठरला आहे.

कारण की नवरात्र उत्सवात केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई भत्ता चार टक्के एवढा वाढवण्यात आला आहे. आधी हा महागाई भत्ता 42% एवढा होता यामध्ये चार टक्के वाढ झाली असल्याने आता महागाई भत्ता 46% एवढा झाला आहे. ही वाढ एक जुलै 2023 पासून लागू झाली आहे. म्हणजेच जुलै 2023 पासून याची अंमलबजावणी होणार आहे.

पण याचा रोखीने लाभ हा चालू महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात जें वेतन मिळेल त्यासोबत मिळणार आहे. विशेष म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी देखील मिळणार आहे. यामुळे सणासुदीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर रेल्वे बोर्डाने देखील रेल्वे भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के एवढा केला आहे.

या कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच हा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे. अशातच महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. खरतर महापालिका कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता लागु करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. हे धोरण 10 ऑक्टोबर रोजी स्वीकारण्यात आले आहे. यामुळे आता महापालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता देणे अपेक्षित आहे.

यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला आहे. सातवा वेतन आयोग अंतर्गत या महापालिकेत कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. एक जुलै 2023 पासून ही वाढ लागू केली जाणार आहे. विशेष म्हणजे ऑक्टोंबरच्या वेतनासोबत व पेन्शनसोबतच याचा रोखीने लाभ मिळणार आहे.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची DA थकबाकी देखील संबंधितांना मिळणार आहे. यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पूर्वीच मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. महागाई भत्ता वेळेत वाढवला गेला असल्याने या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लवकरात लवकर महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळावा अशी मागणी केली जात आहे. कर्मचारी संघटनांनी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. दरम्यान, जाणकार लोकांनी दिवाळीच्यापूर्वीच राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळेल असे सांगितले आहे.

Leave a Comment