State Employee DA Hike : नुकत्याच दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 30 जून 2023 रोजी शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना चार टक्के डीए वाढीचा लाभ देण्यात आला आहे. याचा शासन निर्णय हा राज्य शासनाने 30 जूनला निर्गमित केला आहे.
यानुसार जानेवारी महिन्यापासून राज्य कर्मचाऱ्यांचा 4% DA वाढवण्यात आला आहे. याचा लाभ मात्र जून महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच जुलै महिन्यात जे वेतन मिळेल त्यासोबत रोखीने मिळणार आहे. तसेच 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 पर्यंतच्या कालावधीतील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याचे सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
वास्तविक, गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता. केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर अनेक राज्य सरकारांनी आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी DA वाढवला. यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाकडे देखील यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला.
पण शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय खूपच उशिराने घेतला आहे. दरम्यान उशिराने का होईना पण याबाबतचा निर्णय शासनाने घेतला असल्याने संबंधितांच्या माध्यमातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. आता महागाई भत्ता वाढला आहे याचा लाभ जून महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच जुलै महिन्यात जे पेमेंट येईल त्यासोबत दिला जाणार आहे.
मात्र महागाई भत्ता फरकाची रक्कम ही किती असेल? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण महागाई भत्ता फरकाची रक्कम काढण्यासाठी कोणता फॉर्मुला वापरला जातो. या फॉर्मुलाचा वापर करून महागाई भत्ता फरकाची रक्कम कशी ठरवली जाते हे उदाहरणासहित समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.
कशी काढणार महागाई भत्ता फरकाची रक्कम?
यासाठी एक फॉर्मुला वापरला जातो. मुळवेतन × 4 / 100 = (YY), (YY) × 5 = पाच महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी असा हा फॉर्मुला आहे. यानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी म्हणजे मूळ वेतन हे 40 हजार रुपये असेल तर अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता फरकाची रक्कम ही 40000×4/100=1600, 1600×5 = 8,000 एवढी असेल.