State Employee DA Hike News : देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ दिली जाणार आहे. याचा निर्णय अद्याप झालेला नाही मात्र लवकरच या लोकांना तीन टक्के DA वाढ दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा लाभ लागू झाल्यानंतर लगेचच राज्य कर्मचाऱ्यांना देखील हा लाभ लागू केला जाईल असे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, महाराष्ट्र राज्यातील 17 लाखाहून अधिक राज्य कर्मचाऱ्यांना तीन टक्के डीए वाढ लागू केली जाणार आहे. याचा लाभ जुलै महिन्यापासून अनुज्ञय राहील.
किती होणार महागाई भत्ता?
सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. आता यामध्ये तीन टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. म्हणजेच या सरकारी नोकरदारांना आता जुलै महिन्यापासून 45 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. याची अंमलबजावणी मात्र सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबत केली जाणार आहे.
सप्टेंबर महिन्याचे जे वेतन मिळेल म्हणजेच पेड इन ऑक्टोबरच्या वेतना सोबत राज्यातील सरकारी नोकरदारांना याचा रोखीने लाभ दिला जाणार आहे. यामुळे जुलै ते ऑगस्ट या कालावधीतील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील संबंधितांना देऊ केली जाणार आहे.
केव्हा होणार निर्णय?
याबाबत अद्याप महाराष्ट्र राज्य शासनाकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. मात्र 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असल्याने याचा लाभ गणेशोत्सवापूर्वीच बहाल केला जाऊ शकतो. म्हणजेच याबाबतचा सविस्तर शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाकडून गणेशोत्सव सणाच्या पूर्वीच निर्गमित केला जाणार आहे.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सदर महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीनंतरच घेतला जाणार आहे.
दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन टक्के डीए वाढ लागू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला असल्याचे वृत्त एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे.
याचाच अर्थ केंद्र शासन केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए लवकरच वाढवेल आणि यानंतर राज्य शासनाकडून देखील याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. निश्चितच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी भेट राहणार आहे.