State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरेतर सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. 19 एप्रिल ला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. देशात एकूण सात टप्प्यात आणि आपल्या महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात सभेचे मतदान पूर्ण होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सध्या संपूर्ण देशभर आदर्श आचारसंहिता लागू आहे. मात्र ही आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली जाणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी जुनी पेन्शन योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. सुधारित पेन्शन योजनेअंतर्गत राज्यातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के एवढी रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे.
कौटुंबिक निवृत्तीवेतन म्हणून सेवानिवृत्ती वेतनाच्या 60% एवढी रक्कम मिळणार आहे. तथापि, याबाबतचा शासन निर्णय अजून निर्गमित झालेला नाही. त्यामुळे हा शासन निर्णय केव्हा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मीडिया रिपोर्टनुसार लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अर्थातच केंद्रात नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या या सुधारित पेन्शन योजनेचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो.
एवढेच नाहीतर राज्य कर्मचाऱ्यांची आणखी एक मोठी मागणी पूर्ण होणार आहे. रिपोर्टनुसार, राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आणखी दोन वर्षांनी वाढवले जाणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष एवढे आहे. राज्यातील अ, ब आणि क संवर्गात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे आहे.
दुसरीकडे ड संवर्गात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 60 वर्षे एवढे ठेवण्यात आले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर देशातील जवळपास 25 घटक राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे वय हे 60 वर्षे एवढे आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील वाढवले गेले पाहिजे अशी मागणी सदर नोकरदार मंडळींने गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. विशेष म्हणजे आता या नोकरदार मंडळीची ही मागणी देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे.
वर्तमान शिंदे सरकार याबाबत सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच या मागणीवर सकारात्मक निर्णय होणार असे म्हटले जात होते.पण याचा निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे सरकार राज्य कर्मचाऱ्यांचे वय 60 वर्षे करणेबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.
यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे सरकार घेऊ शकते असा मोठा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होऊ लागला आहे.