State Employee News : महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सेवानिवृत्त राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे. खरे तर गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले आणि वयाचे 80 वर्षे पूर्ण केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती.
दरम्यान, या मागणीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील 80 वर्षापेक्षा जास्तीचे वय असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात वीस ते शंभर टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील जवळपास 75 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार अशी माहिती समोर आली आहे.
त्यामुळे संबंधितांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.विशेष म्हणजे राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी एक जानेवारी 2024 पासून केली जाणार आहे.
खरेतर, केंद्र शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या आणि 80 वर्षांपेक्षा अधिकचे वय असलेल्या सेवानिवृत्तांना वेतन वाढीचा लाभ दिला गेला पाहिजे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे.
आता मात्र ही मागणी पूर्ण झाली आहे. यामुळे संबंधित सेवानिवृत्तांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे. एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सध्या 7 लाख सेवानिवृत्त राज्य कर्मचारी आहेत.
यापैकी 10 टक्के सेवानिवृत्तांचे वय 80 वर्षांपेक्षा अधिकचे आहे. म्हणजेच राज्यातील 70,000 पेक्षा अधिक जणांना शासनाच्या या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे.
किती वाढणात निवृत्तीवेतन ?
ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वय 80 ते 85 दरम्यान आहे त्यांच्या हवेतनात 20 टक्के वाढ होणार आहे. 85 ते 90 वर्षा दरम्यानच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनात 30 टक्के वाढ होणार आहे.
90 ते 95 दरम्यानच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतना 40 टक्के वाढ होणार आहे. तसेच 95 ते 100 दरम्यानच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के वाढ होणार आहे.
विशेष म्हणजे ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वय १०० पेक्षा अधिक आहे अशा लोकांच्या निवृत्तीवेतनात 100% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.