State Employee News : 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला संपणार आहे. यामुळे आता भारतीय निवडणूक आयोग लवकरच 18 व्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर करणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यात की, लगेचच आचारसंहिता लागू होणार आहे.
अशा परिस्थितीत आगामी निवडणुकीत मतदारांना खुश करण्यासाठी शिंदे सरकारने गेल्या काही दिवसांपासून विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अर्थातच 11 मार्चला शिंदे सरकारने राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय शिंदे सरकारने घेतलेत.
आज देखील राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून यादेखील बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय आज घेतले गेले आहेत.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार पोलीस पाटील यांना आता पंधरा हजार रुपये प्रति महिना एवढे मानधन मिळणार आहे.
खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस पाटील यांचे मानधन वाढवले गेले पाहिजे अशी मोठी मागणी केली जात होती. यासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा देखील झाला.
दरम्यान, शासनाने मध्यंतरी या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे म्हटले होते. वर्तमान शिंदे सरकारने पोलीस पाटील यांचे मानधन 15000 रुपये एवढे केले जाईल असे नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते.
यानुसार पोलीस पाटील यांचे मानधन 15000 रुपये प्रति महिना एवढे करण्याचा मोठा निर्णय आज वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
याशिवाय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा स्वयंसेविका यांच्या देखील मानधनात वाढ करण्याचा निर्णय झाला आहे.
आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात 5 हजार रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतलेला आहे. यामुळे राज्यातील पोलीस पाटील आणि आशा स्वयंसेविका यांना मोठा दिलासा मिळणार आहे.