State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून मीडिया रिपोर्टमध्ये कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार असा दावा केला जात आहे.
पुढल्या वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका राहणार आहेत. शिवाय महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने तसे संकेत दिले आहेत. सर्वप्रथम लोकसभेच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
अशा परिस्थितीत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो असे मत व्यक्त केले जाऊ लागले आहे.
फिटमेंट फॅक्टर वाढणार ?
मीडिया रिपोर्टनुसार, 2024 मध्ये आठवा वेतन आयोगासाठीची समिती स्थापित केली जाणार आहे. त्यानंतर मग दोन वर्षांनी आठवा वेतन आयोग लागू केला जाणारा असा दावा होत आहे.
म्हणजेच 2026 मध्ये नवीन आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो असे बोलले जात आहे. तसेच आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर मध्ये देखील वाढ होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 पट एवढा आहे. यामध्ये आता वाढ होईल आणि हा फॅक्टर 3.58 पट होणार असा अंदाज आहे.
राज्य कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार
फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळपगार 8,000 रुपयांनी वाढणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान पगार 18 हजार रुपये एवढा आहे. पण हा फॅक्टर वाढल्यानंतर हा किमान मूळ पगार 26 हजारावर जाणार आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 15000 वरून वाढून 21000 होणार आहे. मात्र आठवा वेतन आयोगाबाबत नुकतच केंद्र शासनाच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
केंद्र शासनाने सध्या शासन दरबारी आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आठवा वेतन आयोग नेमका केव्हा लागू होणार हा मोठा सवाल आहे.