State Employee News : राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आज 30 जून 2023 रोजी शिंदे-फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.
खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने जानेवारी महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला. यानुसार सेंट्रल मधील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के एवढा झाला. याआधी 38 टक्के दराने महागाई भत्ता म्हणजे DA मिळत होता. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळाल्यानंतर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्यांना देखील हा लाभं लवकर मिळणे अपेक्षित होते. परंतु शिंदे-फडणवीस सरकारने यासाठी खूपच विलंब केला आहे.
मात्र देर आए दुरुस्त आए या उक्तीप्रमाणे आज अखेर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात देखील 4% वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 42 टक्के एवढा होणार आहे.
यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. वास्तविक, डीए वाढीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला आज यश आले आहे. यामुळे संबंधितांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
महागाई भत्ता फरकाची रक्कम पण मिळणार!
शासनाने माहे जानेवारीपासून महागाई भत्ता अनुज्ञयं केला आहे. हा लाभ जून महिन्याच्या वेतनासोबत रोखीने अदा केला जाणार आहे. म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात जें जून महिन्याचे वेतन अदा होणार आहे त्यासोबत याचा लाभ दिला जाणार आहे.
अर्थातच 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023 पर्यंतच्या कालावधीमधील महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील राज्य शासनाकडून दिली जाणार आहे. निश्चितच, राज्य शासनाचा हा निर्णय राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचा हिताचा असून यामुळे त्यांचा आर्थिक फायदा सुनिश्चित होणार आहे.
शासन निर्णयाची पीडीएफ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जा
https://acrobat.adobe.com/link/track?uri=urn:aaid:scds:US:b7c43cd5-a5e0-3ca6-bed8-b18bd10fb683